महाराष्ट्र - सांस्कृतिक धोरण.


महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी:
'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
पैठण येथे संतपीठ
महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.

Short forms to remember !



Sr. No.




                                                                                            






Abbreviation











 Stands For
1AAFIAmateur Athletics Federation of India
2AAPSOAfro-Asian People's Solidarity Organisation
3AASUAll Assam Students Union
4ABMAnti Ballistic Missile
5ACAlternate Current OR Air Conditioner
6ACCAncillary Cadet Core
7ADAno Domini (After the birth of Jesus)
8ADBAsian Development Bank.
9AEREAtomic Energy Research Establishment
10AGOCAsian Games Organisation Committee
11AICCAll India Congress Committee
12AICTEAll India Council of Technical Education
13AIDSAcquired Immuno Deficiency Syndrome
14AIFEAll India Football Federation
15AIIMSAll India Institute of Medical Sciences
16AILAeronautics India Limited
17AIMPLBAll India Muslim Personal Law Board
18AIRAll India Radio (Broadcasting)
19AITUEAll India Trade Union Congress
20AMAnti Meridian (Before Noon)
21ANCAfrican National Congress
22APECAsia Pacific Economic Cooperation
23APSCArmy Postal Services Core
24ASEANAssociation of South East Asian Nations
25ASLVAugmented Satellite Launch Vehicle
26ASIArchaeological Survey of India
27ASSOCHAMAssociated Chamber of Commerce and Industry (India)
28ASWACAirborne Surveillance Warning and Control
29ATSAnti Tetanus Serum
30BAMSBachelor of Ayurvedic Medicine and Surgery
31BARCBhabha Atomic Research Centre
32BBCBritish Broadcasting Corporation
33BCBefore Christ (Before the birth of Jesus)
34BCGBacillus Calmette Guerin (Anti TB Vaccine)
35BCCIBoard of Control for Cricket in India
36BELBharat Electronics Limited
37BENELUXBelgium, Netherlands and Luxemburg
38BHELBharat Heavy Electronics Limited
39BIFRBoard of Industrial Finance and Reconstruction (Formerly Industrial Reconstruction Finance Board)
40BIMSTECBangladesh, India, Myanmar, Sri Lanka, Thailand Economic Cooperation
41BISBureau of Indian Standards
42B PharmaBachelor of Pharmacy
43BSFBorder Security Force
44CADCommand Area Development
45CAGComptroller and Auditor General
46CARECooperative for American Relief Everywhere
47CASECommission for Alternative Sources of Energy
48CBICentral Bureau of Investigation
49CBSECentral. Board of Secondary Education
50CCEACabinet Committee on Economic Affairs
51CCSCabinet Committee on Security
52C-DACCentre For Development of Advance Computing
53CDMACode Division Multiple Access
54CDRICentral Drug Research Institute
55CHOGMCommonwealth Heads of Government Meeting
56CIDCriminal Investigation Department
57CISCommonwealth of Independent States
58CISFCentral Industrial Security Force
59CITUCentre of Indian Trade Unions
60CLATCommon Law Admission Test (Started May 2008)
61CNGCompressed Natural Gas
62CODCentral Ordnance Depot
63COFEPOSAConservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Act
64CPOCentral Passport Organisation
65CPRICentral Power Research Institute
66CRPFCentral Reserve Police Force
67CRRCash Reserve Ratio
68CSIRCouncil of Scientific and Industrial Research
69CSOCentral Statistical Organisation
70CTSComputerised Tomography Scanner
71CVCCentral Vigilance Commission
72DDTDichloro Diphenyle Tri-chloroethane
73DFDR'Digital Flight Data Recorder (Black box)'
74DIGDeputy Inspector General
75D. Lit.Doctor of Literature
76DMDistrict Magistrate
77DMKDravida Munetra Kazhagam
78DNADi-oxyribo-Nucleic Acid
79DPAP'Drought Prone Area Programme
80DPCDabhol Power Company
82DRDODefence Research and Development Organisation
83DTHDirect to Home
84DVDDigital Versatile Disk
85EASEmployment Assurance Scheme
86ECDEuropean Central Bank
87ECGElectro Cardiogram
88EECEuropean Economic Community
89EEGElectro Encephalogram
90ELISAEnzyme Linked Immuno Sorbent Assay
91EMFElectromotive Force
92EPABXElectronic Private Automatic Branch Exchange
93EPZExport Processing Zone
94ERDAEnergy Research and Development Administration
95ESMAEssential Services Maintenance Act
96EVMElectronic Voting Machine
97EXIM BankExport-Import Bank of India
98FAOFood and Agriculture Organisation
99FBIFederal Bureau of Investigation (USA)
100FBTRFast Breeder Test Reactor
101FCIFood Corporation of India / Fertilizer Corporation of India
102FDRFlight Data Recorder (Black Box)
103FERAForeign Exchange Regulation Act
104FEMAForeign Exchange Management Act
105FICCIFederation of India Chambers of Commerce and Industry
106FIPBForeign Investment Promotion Board
107FIRFirst Information Report
108FRSFellow of the Royal Society
109FTIIFilms and Television Institute of India
110FTZFree Trade Zone
111GAILGas Authority of India Limited
112GATTGeneral Agreement on Tariff and Trade
113GICGeneral Insurance Corporation
114GMTGreenwich Mean Time
115GNLFGorkha National Liberation Front
116GNPGross National Product
117GPFGeneral Provident Fund
118GPOGeneral Post Office
119GPSGlobal Positioning System
120GSIGeological Survey of India
121HACHindustan Aluminium Corporation
122HALHindustan Aeronautics Limited
123HCFHighest Common Factor
124HDFCHousing Development Finance Corporation
125HIVHuman Immuno-deficiency Virus
126HMTHindustan Machine Tools
127HUDCOHousing and Urban Development Corporation
128HYVSHigh Yield Variety Seeds
129IAAIInternational Airport Authority of India
130lACIndian Airlines Corporation
131IAEAInternational Atomic Energy Agency
132IARIIndian Agricultural Research Institute
133IBRDInternational Bank for Reconstruction and Development (World Bank)
134ICARIndian Council of Agricultural Research
135ICBMInter Continental Ballistic Missile
136ICCInternational Cricket Council
137ICFTUInternational Confederation of Free Trade Unions
138ICICIIndustrial Credit and Investment Corporation of India Limited
139ICJInternational Court of Justice
140ICMRIndian Council of Medical Research
141ICSIIndian Company Secretaries Institute
142IDAInternational Development Agency
143IDBIIndustrial Development Bank of India
144IDOInternational Defence Organisation
145IDPLIndian Drugs and Pharmaceuticals Limited
146IFAIndian Football Association
147IFCIIndustrial Finance Corporation of India
148IFFIInternational Film Festival of India
149IFFCOIndian Farmers Fertilizers Cooperative
150IFTUInternational Federation of Trade Unions
151IIPAIndian Institute of Public Administration
152IISIndian Institute of Sciences
153IISCOIndian Iron and Steel Company
154IITIndian Institute of Technology
155ILOInternational Labour Organisation
156IMAIndian Military Academy
157IMFInternational Monetary Fund
158INGCAIndira Gandhi Gallery for Culture and Art
159INSIndian Naval Ship
160INSATIndian National Satellite
161INTELSATInternational Telecommunication Satellite
162INTERPOLInternational Police Organisation
163INTUCIndian National Trade Union Congress
164IOCInternational Olympic Committee / Indian Oil Corporation
165IPCIndian Penal Code
166IPKFIndian Peace Keeping Force
167IQIntelligence Quotient
168IRBMIntermediate Range Ballistic Missile
169IRCInternational Red Cross
170IRDAInsurance Regulatory Development Authority
171IRDPIntegrated Rural Development Programme
172ISBIndian Standard Bureau
173ISMIndian School of Mines
174ISOInternational Organisation for Standardisation
175ISPInternet Services Provider
176ISROIndian Space Research Organisation
177ISTIndian Standard Time
178ITBPIndo-Tibet Border Police
179ITDCIndian Tourism Development Corporation
180ITPOIndian Trade Promotion Organisation
181ITOInternational Trade Organisation
182IUCNInternational Union for Conservation of Nature and Natural Resource
183ITUCIndian Trade Union Congress
184JMMJharkhand Mukti Morcha
185KGKinder Garten
186LASERLight Amplification By Stimulated Emission of Radiation
187LICLife Insurance Corporation of India
188LLBBachelor of Law
189LLMMaster of Law
190LMGLight Machine Gum
191LoCLine of Control (Pakistan)
192LoACLine of Actual Control (China)
193LPGLiquefied Petroleum Gas
194LSDLysergic acid diethylamide
195LTTELiberation Tigers of Tamil Elam
196MAMaster of Arts
197MASERMicrowave Amplification by Stimulated Emission of Radiation
198MBAMaster of Business Administration
199MBBSBachelor of Medicine and Bachelor of Surgery
200MBTMain Battle Tank
201MCAMonetary Compensatory Allowance / Master of Computer Application
202MCCMelbourne Cricket Club
203MDDoctor of Medicine
204MFNMost Favoured Nation
205MIMilitary Intelligence
206MISAMaintenance of Internal Security Act
207MITMechachusates Institute of Technology (USA)
208MLAMember of Legislative Assembly
209MLCMember of Legislative Council
210MNCMulti National Corporation
211MRCPMember of Royal College of Physicians
212MRCSMember of Royal College of Surgeons
213MRTPCMonopoly and Restrictive Trade Practices Commission
214MODVATModified Value Added Tax
215NABARDNational Bank for Agricultural and Rural Development
216NACONational AIDS Control Organisation
217NAEPNational Adult Education Programme
218NAFEDNational Agricultural and Marketing Federation
219NAFTANorth American Free Trade Agreement
220NAPPNarora Atomic Power Plant
221NASANational Aeronautics and Space Administration (USA)
222NASDAQNational Association of Security Dealer's Active Quotation
223NASSCOMNational Association of Software & Service Companies
224NATONorth Atlantic Treaty Organisation
225NCWNational Commission for Women
226NCCRNational Council for Civil Right
227NCERTNational Council of Educational Research & Training
228NDANational Defence Academy
229NDDBNational Dairy Development Board
230NDFNational Defence Fund.
231NEERINational Environment Engineering Research Institute
232NEFANorth-East Frontier Agency
233NEPANational Environment Protection Authority
234NFDCNational Film Development Corporation
235NFLNational Fertilizer Limited
236NHRCNational Human Rights Commission
237NICONew Information and Communication Order
238NIDCNational Industrial Development Corporation
239NIITNational Institute of Information Technology
240NIMHANSNational Institute of Mental Health and Neuro-Sciences
241NITIENational Institute for Training in Industrial Engineering
242NMDSNational Missile Defence System (US)
243NMEPNational Malaria Eradication Programme
244NOIDANew Okhla Industrial Development Authority
245NPCNational Productivity Council
246NPPNational Population Policy
247NPTNuclear Non-Proliferation Treaty
248NRDCNational Research and Development Corporation
249NREPNational Rural Employment Programme
250NRINon Resident Indian
251NSCNational Security Council
252NSSONational Sample Survey Organisation
253NTCNational Textile Corporation
254NTPCNational Thermal Power Corporation
255OGLOpen General Licence
256OILOil India Limited
257OKAll Correct
258ONGCOil and Natural Gas Commission
259OPECOrganisation of Petroleum Exporting Countries
260PCIPress Council of India
261PCSProvincial Civil Services
262Ph. DDoctor of 'Philosophy
263PINPostal lndex Number
264PLOPalestine Liberation Organisation
265PMPost Meridian / Prime Minister
266POTAPrevention of Terrorism Act
267PSLVPolar. Satellite Launch Vehicle
268PTIPress Trust of India
269PROPublic Relations Officer
270PTOPlease Turn Over
271PVCPoly Vinyl Chloride / Paramvir Chakra
272PVSMParam Vishisht Seva Medal
273PWDPublic Work's Department
274PWGPeople's War Group
275QEDQuod Erat Demonstrandum (Which was to be proved)
276QEFQuod Erat Faciendum (Which was to be done)
277QEIQuod Erat Inveniendum (Which was to be found)
278QMGQuarter Master General
279RADARRadio Angle Direction and Range
280RAWResearch and Analysis Wing
281R & DResearch and Development
282RBIReserve Bank of India
283RCCReinforced Cement Concrete
284RDXResearch Developed Explosive
285RIMCRashtriya Indian Military College
286RMSRailway Mail Service
287RLEGPRural Landless Employment Guarantee Programme
288RNARibonucleic Acid
289RPMRevolutions Per Minute
290RSSRashtriya Swayamsevak Sangh
291RTORegional Transport Officer
292SAARCSouth Asian Association for Regional Cooperation
293SACSpace Application Centre
294SAFTASouth Asian Free Trade Agreement
295SAISports Authority of India
296SAILSteel Authority of India Limited
297SAPTASouth Asian Preferential Trade Arrangement
298SARSSevere Acute Respiratory Syndrome
299SCSecurity Council/Supreme Court
300SCIShipping Corporation of India
301SCOPEStanding Conference of Public Enterprises
302SCRASpecial Class Railway Apprentice
303SDRSpecial Drawing Rights
304SEBISecurity Exchange Board of India
305SGPCSiromani Gurudwara Prabandhak Committee
306SHARShri Harikota Range
307SIDBISmall Industries Development Bank of India
308SISSecret Intelligence Service (U.K)
309SITASuppression of .Immoral Traffic in Women and Girls Act
310SLVSatellite Launch Vehicle
311SPCASociety for the Prevention of Cruelty of Animals
312SPICMCSociety for the Promotion of Indian Classical music and culture
313STARSSatellite Tracking and Ranging Station
314STDSubscribers Trunk Dialing
315STPISoftware Technology Parks of India
316SWAPOSouth West African People's Organisation
317TATravelling Aliowance / Territorial Anmy
318TELCOTata Engineering and Locomotive Company
319TELEXTeleprinter Exchange
320TISCOTata Iron and Steel Company Limited
321TNTTri-nitro-toluene
322TOEFLTest of English as a Foreign Language
323TRAITelecom Regulatory Authority of India
324TRIPSTrade Related Intellectual Property Rights
325TTETravelling Ticket Examiner
326TTFITable Tennis Federation of India
327TWATrans World Airlines (USA)
328UDCUpper Division Clerk
329UFOUnidentified Flying Object
330UGCUniversity Grants Commission
331UHTUltra High Temperature
332ULFAUnited Liberation Front of Assam
333UNASURUnion of South American Nations (Spanish: Unión de Naciones Suramericanas)
334UNCTADUnited Nations Conference on Trade and Development
335UNDPUnited Nations Development Programme
336UNEFUnited Nations Emergency Force
337UNEPUnited Nations Environment Programme
338UNESCOUnited Nations Economic Social and Cultural Organisation
339UNFPAUnited Nations for Population Activities
340UNHCRUnited Nations High Commission for Refugees
341UNIUnited News of India
342UNICEFUnited Nations International Children's Emergency Fund
343UNOUnited Nations Organisation
344UPSUninterrupted Power Supply
345UPSCUnion Public Service Commission
346USSRUnion of Soviet Socialist Republic
347UTIUnit Trust of India
348VATValue Added Tax
349VDISVoluntary Disclosure of Income Scheme
350VCVice-Chancellor / Victoria Cross
351VIPVery Important Person
352VPPValue Payable Post
353VRSVoluntary Retirement Scheme
354VSNLVidesh Sanchar Nigam Limited
355VSSCVikram Sarabhai Space Centre
356WEFWorld Economic Forum
357WHOWorld Health Organisation
358WILLWireless in Local Loop
359WMOWorld Meteorological Organisation
360WWFWorld Wild Life Fund
361WPIWholesale Price Index
362WTOWorld Trade Organisation
363WWFWorld Wild Life Fund for Nature
364WWWWorld Wide Web
365YMCAYoung Men's Christians Association
366YWCAYoung Women's Christians Association
367ZBBZero Based Budgeting
368ZSIZoological Survey of India

more soon.......

What to read online/offline for MPSC UPSC काय वाचायला पाहिजे?


MPSC / UPSC काय वाचायला पाहिजे?

Here on the Internet you can find many publications and sites which will guide you properly 
Read carefully and get helped

1.For Agricultural knowledge : 
---Portal of govt of Maharashra
---Agrowon:daily newspaper for agriculture updates

2.चालू घडामोडी(Current affairs)
---Site for major newspapers in hindi and english
--इंडिया इयर बुक २०१०
--Magazine for various yojnas
--saptahiksakal :good magazine to read
--लोकराज्याच्या विविध आवृत्ती
--forum to discuss all matters
--current-affairs-quiz
---For few Marathi magazines


3.Also you can read other MPSC UPSC blogs which includs.....
--For G K
-- MPSC related FAQs
-- AnilMD's Blog
--Best ever blog you seen !!

‘चालू घडामोडी’ (करंट इव्हेंटस्) हा घटक अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे.
‘चालू घडामोडी’चे हे महत्त्व लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी आपल्या त 51;ारीच्या प्रारंभीच हे ठरविणे गरजेचे आहे की, पूर्वपरीक्षेतील ‘वैकल्पिक विषय’ आणि ‘सामान्य अध्ययन’ या दोन विषयांसोबतच चालू घडामोडी हा जणू तिसरा विषय ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ एवढाच की, चालू घडामोडी या घटकाला स्वतंत्रपणे पुरेसा वेळ देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या वेळेच्या एकूण नियोजनात वैकल्पिक विषयास ६०%, सामान्य अध्ययनास ३०% तर चालू घडामोडीस किमान १० ते १५% वेळ राखीव ठेवला पाहिजे.
चालू घडामोडीची तयारी सुरू करण्यापूर्वी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासपद्धतीचा एक भाग म्हणून गेल्या १० वर्षांतील मागील प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. यातून उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे हे लक्षात येते की, साधारणत: दरवर्षी या घटकावर ५० ते ६० प्रश्न विचारण्यात येत आहेत. या विश्लेषणातूनच चालू घडामोडींवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ, दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार व सन्मान, केलेल्या नियुक्त्या, विविध परिषदा, चर्चेतील व्यक्ती, महत्त्वाची पुस्तके, ग्रंथ व लेखक इ. विषयांवर प्रश्न विचारले जातात हे लक्षात येते. तसेच या विश्लेषणातून आणखी एक बाब लक्षात येते की, ती म्हणजे चालू घडामोडी या स्वतंत्रपणे तर विचारल्या जातातच, मात्र सामान्य अध्ययनातील सद्य घटना, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, भूगोल इ. विविध घटकांशी संबंधित चालू घडामोडीदेखील विचारल्या जातात. उदाहरणार्थ, २००९ मध्ये राज्यघटनेवर आधारित प्रश्नांमध्ये, ‘कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा ë0;ंत्रिमंडळाची संख्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्येच्या १५% एवढी मर्यादित करण्यात आली?’ असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडीची तयारी आवश्यक ठरते. विशेषत: अर्थव्यवस्थेच्या बाबतीत शासनाने जाहीर केलेल्या योजना, धोरणे, आर्थिक पाहणीतील आकडेवारी, अर्थसंकल्पातील काही बाबींवर प्रश्न विचारले जातात.
प्रश्नांचे विश्लेषण करून शेवटी आपल्या अभ्यासाची पद्धती निर्धारित करावी. मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचा पद्धतशीर विचार करून त्यांचे पुढीलप्रमाणे सूत्रबद्ध वर्गीकरण करावे. नियुक्त्या-निवड-बढती; पुरस्कार, सन्मान, पारितोषिके; ग्रंथ-लेखक, निधन; चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र; महत्त्वाच्या चर्चेतील कंपन्या, संस्था व त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र; महत्त्वाच्या परिषदा, संघटना; चर्चेतील ठिकाणे; विज्ञानातील शोध; महत्त्वाच्या समित्या- आयोग व त्यांचे अहवाल; नव्या योजना व धोरणे; महत्त्वाची आर्थिक आकडेवारी; महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या; महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ. अर्थात हे वर्गीकरण काहीसे लवचिक स्वरूपाचेच असावे. या वर्गीकरणानंतर प्रत्येक विभागात पुन्हा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी करावी. थोडक्यात, प्रश्नांचे रूप लक्षात घेऊन त्यावर आधारित ‘वर्गीकरण चार्ट’ बनवावेत आणि त्या त्या विभागात संबंधित घटना नमूद करावी.
चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी पद्धती व व्याप्ती निश्चित केल्यावर महत्त्वाचा प्रश्न उरतो तो संदर्भग्रंथाचा. या घटकाच्या तयारीसाठी ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ हे वर्तमानपत्र; फ्रंटलाईन या पाक्षिकातील कव्हरस्टोरीज; योजना, क्रोनिकल व विझार्ड ही मासिके; ‘इंडिय 66; इयर बुक’; चालू वर्षांतील आर्थिक पाहणी अहवाल हे संदर्भसाहित्य जरुरीचे ठरते. एवढय़ा मोठय़ा संदर्भसूचीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यापैकी हिंदू हे वर्तमानपत्र नियमित दीड ते दोन तास वाचावे, तर फ्रंटलाईनमधील कव्हरस्टोरीज (२० पाने) वाचल्या तरी पुरेसे ठरते. योजनेची सुमारे ४०-५० पाने वाचायची असतात. क्रोनिकल हे मासिक पायाभूत ठेवून त्यास विझार्डची जोड दिल्यास त्यातून फारच कमी भाग अभ्यासावा लागतो हे लक्षात येते. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात एक बाब लक्षात ठेवावी की, हिंदू हे वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे वाचल्यास इतर संदर्भ हे लवकर वाचून होतात. किंबहुना बऱ्याच घटनांची उजळणीच होते. त्यामुळे वेळेचे नियोजन करताना वर्तमानपत्र नियमितपणे वाचावे आणि इतर संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील एक दिवस दिला तरी पुरेसे ठरेल. म्हणजे सात ते आठ तासांचा एक दिवस असे एका महिन्यातील चार दिवस (म्हणजे ३२ तास) दिल्यास उर्वरित मासिके व्यवस्थिरीत्या वाचून होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या सोईनुसार यात लवचिकता ठेवल्यास काही हरकत नाही.
चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि त्यानुसार नोटस् काढाव्यात. म्हणजे एखादी महत्त्वाची परिषद झाली असल्यास तिचे ठिकाण, देश, त्या परिषदेतील मुद्दे व फलित; त्याच मुद्दय़ावरील मागील परिषदा, त्यांचे ठिकाण याचीही माहिती जमा करावी किंवा विविध स्पर्धाची तयारी करताना खेळाडू, क्रीडाप्रकार, स्पर्धाचा निकाल, त्यातील विक्रम; विजेता-उपविजेता याबरोबरच त्यांचे देशही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या चालू घडामोडीची तयारी करताना तिच्या आजूबाजूला शक्य त्या घटनांची तयारी करावी.
प्रस्तुत विषयाची तयारी करताना विविध माहितीची नोंद करण्यासाठी ‘डायरी’चा फॉर्मही वापरावयास हरकत नाही. कारण ‘डायरी फॉर्म’मधील माहिती केव्हाही, फावल्या वेळात वाचता येते. शिवाय चालू घडामोडीवरील प्रत्येक 60;ंदर्भाची सतत उजळणी म्हणजे रिव्हिजन करणे अत्यावश्यक आहे. तसेच या घटकांवर आधारित भरपूर प्रश्नांचा सरावही पूरक ठरतो. एकंदर प्रश्नांचे बारकाईने केलेले विश्लेषण, त्यावर आधारित चालू घडामोडींची तयारी, योग्य रिव्हिजन आणि प्रश्नांचा सराव या घटकासाठी मध्यवर्ती ठरतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन तयारी केल्यास ६० प्रश्नांपैकी किमान ५० प्रश्न अचूकपणे सोडवता येतील हे लक्षात घ्यावे. स्वाभाविकच अवघड वाटणाऱ्या सामान्य अध्ययनात अपेक्षित गुण मिळविण्यासाठी हा घटक सिंहाचा वाटा उचलणारा ठरतो आणि आपले आयएएसचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक पूर्वपरीक्षेचा अडथळा यशस्वीपणे पार करता येतो.
 


Reference Books for Maharashtra Lokseva Ayog


1. Study Circle Publications PSI Preliminary Examination Planner
By Dr. Anand Patil
Pages 1055
Price Rs. 450/-

2. Study Circle Publications Spardha Pariksha
Monthly magazine Rs. 30/-

3. Latest Chalu Ghada Modi
By Datta Sangolkar
Pages 160
Price Rs. 50/-

4. Pradnya's MPSC Rajya Seva Purva Pariksha Planner
By Sayas Karad
Pages 628
Price Rs. 400/-

एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती:मार्गदशन


महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषयी माहिती:मार्गदशन


एमी.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीबद्दल आणि त्या परीक्षेत कसं यश मिळवलं पाहिजे, एम.पी.एस.सी.चा अभ्यास कसा केला पाहिजे, या मुद्द्यांना अनुसरून सर्वसमावेशक अशी चर्चा करण्यात आली. 
या चर्चेत स्टडी सर्कलचे आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केलं.

एम.पी.एस.सीचं वेड शहरी भागापेक्षा ग्रामीण महाराष्ट्रात जास्त आहे. इंटरव्ह्यू तर अगदी येऊन ठेपले आहेत. शेवटच्या क्षणी तुम्ही काही टीप्स द्याला का ?

आनंद पाटील : पूर्वी एम.पी.एस.ची परीक्षा ही 100 मार्कांची होती. यंदा पहिल्यांदाच ती 200 मार्कांची आहे. 1600 मार्कांची परीक्षा यापूर्वी झालेली आहे. आता या 1800 गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जर 1 हजार 500 किंवा 1100 गुण मिळवले तर मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो. पूर्व परीक्षांचा निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1600 पैकी 847 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांनी चिंता करण्याचं कारण आहे. एमपीएससीत ओेबीसीसाठी जो स्पोटर्स कोटा आहे त्यातलं उत्तीर्ण होण्याचं प्रमाणं महाविद्यालयांसारखं 40 टक्क्यांचं आहे. ज्यांना 442 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांना मुलाखतीत बोलावलं जाणार आहे. मुलाखतीची चांगली तयारी केली 200 पैकी 150 पर्यंत गुण एखाद्या विद्यार्थ्याला सहज मिळू शकतात.

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे ?

आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांमधून निवडला जाणारा उमेदवार हा एखाद्या विभागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, एखाद्या विशिष्ट खात्याचा प्रमुख असतो. त्याच्याकडची निर्णय क्षमता, परिस्थितीला आकलन करून घेण्याची क्षमता, समस्यांवर तोडगा काढण्याची कुवत उमेदवारात असायला हवी. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे ती क्षमता असायला हवी. आणि याचीच चाचपणी ही मुलाखती दरम्यान केली जाते. यासाठी मुलाखती दरम्यान उमेदवाराला एखादा प्रश्न विचारला असता त्यानं तो नीट ऐकला पाहिजे. प्रश्न विचारण्याला काय उत्तर अपेक्षित आहे, याचा अंदाज विद्यार्थ्याला असायला हवा. दिली गेलेली उत्तरं ही मुद्देसूद, परिणमकारक आणि जास्त वेळ घेणारी असता कामा नये. ती क्वीक आणि सेन्सिबल असायला हवी. मुलाखत ही 15 ते 20 मिनिटांची असते. तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या खिडकीत तुम्ही 200 गुणांसाठी कसा चांगला निर्णय घेता हे दाखवायचं असतं. संख्यात्मक उत्तरं देण्यापेक्षा आपली उत्तरं ही गुणात्मक किती दर्जेदार असतील याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असायला हवा. ब-याचवेळा आपण टिपिकल साचेबद्ध इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. उमेदवाराकडची ओरिज्नॅलिटी जशीच्या तशी मुलाखत देताना बाहेर आली पाहिजे.

मुलं मुलाखतीचं प्रचंड टेन्शन घ;ेतात. तर हे टेन्शन येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ?

आनंद पाटील : टेन्शन घ्यायचं नसेल तर उमेदवाराकडे आत्मविश्वास असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. हा प्रश्न विचारला तर ब-याच मुलांना भीती वाटते. मी जर बाजूनं बोललो तरी मला गुण पडणार नाही. बाजूनं नाही बोललो तरी मला गुण मिळणार नाहीत, ही भीती विद्यार्थ्यांना वाटत असते. तर ही भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे भूमिकेची निश्चितता असायला हवी.



यु.पी.एस.सी. , एम.पी.एस.सी परीक्षांचे फॉर्म कधी निघतात ?

आनंद पाटील : निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघतात. त्या जाहिरातींवर लक्ष ठेवलं पाहिजे. या एका आठवड्यामध्ये विक्रीकर निरीक्षकाच्या पदांसाठीच्या परीक्षेचे फॉर्म निघतील. तर या परीक्षांच्या जाहिरात प्रसिद्धीनंतर साधारण महिन्याभराचा वेळ दिला जातो. हा वेळ परीक्षेच्या तयारीसाठी असतो. यु.पी.एस.सीच्या वर्षाला साधारण 16 परीक्षा होतात. एम.पी.एस.सीच्याही साधारण तेवढ्याच परीक्षा होतात.

सद्यस्थितीत आपल्याला दोन प्रकारचे ट्रेन्डस् पहायला मिळत आहे. एकीकडे डॉक्टर , इंजिनिअर होण्यासाठी धडपडणा-या मुलांचा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या विद्यार्थ्यांचा एक वर्ग पहायला मिळतो. तर या स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या मुलाचं प्रमाण तरी काय आहे ? दरवर्षी लाखांच्या संख्येनं विद्यार्थी परीक्षेला बसतात का ?

आनंद पाटील : महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे त्यात साधारणपणे दीड हजारांपेक्षा जागा स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून भरल्या जातात. या स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं किमान वय हे 19 आणि ओबीसी आणि इतर जातीेंसाठी 39 वर्षं आहे. तसं आयोगानं ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार साधारणपणे तीन कोटी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. यातले पदवीधर विद्यार्थी हे 40 टक्के असतात. तर साधारण 40 लाख विद्यार्थी या परीक्षांना पात्र ठरणारे असतात. स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्यक्ष तयारी करणारे विद्यार्थी 4 लाख असतात. प्रत्यक्ष बसणारे 2 ते अडीच लाख असतात. दोन - अडीच लाखांतून दीड हजार विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षांसाठी केली जाते.

सैन्यदलात काम करणा-या माजी सैनिकांना जर एम.पी.एस.सी.ची परीक्षा द्यायची असेल तर काही स्पेशल तरतूद आहे का ? आनंद पाटील : माजी सैनिकांसाठी गेल्यावर्षीपर्यंत मंत्रालयातल्या पी.एस.आय., एस.पी.आय. या मंत्रालयातल्या जागांसाठी परीक्षा होत्या. या परीक्षांच्या वयोमार्यादेत सूट होती. त्यामुळे असे विद्यार्थी वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायचे. पण आता अशा स्वरूपातल्या परीक्षा देणं बंद केलं आहे. सैन्यदलासाठीचा स्पेशल कोटा बंद केला आहे. पण आता 38 वर्षं वयाचा डिफेन्समध्ये नोकरी करणारा उमेदवार ओबीसी किंवा इतर कोणत्याही अनुसुचित जाती जमातींपैकी असेल तर तर तो देऊ शकतो. डिफेन्समध्येअसणारा 33 वय वर्षं असणारा ओपन कॅटेगीरीतला विद्यार्थी मंत्रालयातल्या क्लास थ्रीच्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो. इन सर्व्हिसमध्ये असताना परीक्षा देता येतात. पण डिफेन्ससाठीचा स्पेशल कोटा पदांचं अपग्रेडेशन केल्यापासून रद्द केला आहे.

विज्ञान शाखेतून शिक्षण शिकत असलेल्या एम.पी.एस.सी.च्या परीक्षांसाठी काय स्कोप आहे ?

आनंद पाटील : चांगला स्कोप आहे. 19 किंवा 20 व्या वर्षी जर विद्यार्थ्यांनी एमपीएसची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झालात डेप्युटी कलेक्टर होता येतं. आणि चाळीसाव्या वर्षी परीक्षा न देता आय.एस होता येतं. इथे तुम्हाला वरची जागा मिळते.

साधारणपणे या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी किती आधीपासून तयारी करावी ? सामाजिक प्रश्नांची जाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत ?

आनंद पाटील : स्पर्धापरीक्षांसाठी आवश्यक असणारं ज्ञान साधारणपणे आपल्याला कोणत्याही शाखेतून मिळतं. स्पर्धा परीक्षांचा बेसिक अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची मूलभूत आकलन क्षमता जाणून घेण्यासाठीचा असतो. त्यामुळे आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थ्यानं काय वाचलंय, कसं वाचलंय, ते लक्षात कसं ठेवलंय, समजून घेऊन केलंय की नाही यावर अवलंबून असतं.आणि हेच स्पर्धा परीक्षांच्या बेसिक तयारीत तपासून पाहिलं जातं. समजा कोणत्याही विद्यार्थ्याला 20 व्या किंवा 21 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी साधारणपणे 12 व्या किंवा 13 व्या वर्षाप 66;सून करायला हवी. लहानातली लहान प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

एपीएससीची परीक्षा देताना परीक्षेचं माध्यम काय असावं ?

आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना साधारणपणे लेखी आणि मुलाखत देताना परीक्षेचं माध्यम साधारणपणे सारखंच असावं. लेखी परीक्षेला वेगळं माध्यम आणि मुलाखतीला वेगळं माध्यम असं असू नये. इंग्रजीतून बोलता येत नसेल तर दुभाषिकाचा उपयोग करावा. मराठी भाषेचा वापर करून स्पर्धा परीक्षा देता येते. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी. ते स्पर्धा परीक्षेत भारतातून दुसरे आले होते. त्यांनी मराठी भाषेतूनच स्पर्धा परीक्षा दिली होती.



इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ? आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.

एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ? आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.

डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?

आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.

ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?

आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्यासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.

कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?

आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्‌ना या दोन्ही परीक्षा देता येतात.

हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला 

?

आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे. 


अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?

आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणविभागणी


पूर्वपरीक्षेच्या गुणांकाची विभागणी

एकूण गुण :200
कला/समाजशाखा : 30
बौध्दिक चाचणी : 50
चालू घडामोडी : 30
शास्त्र आणि तंत्रज्ञान :30
वाणिज्य आणि अर्थशास्त्र :30
शेती : 30

मुख्य परीक्षा गुणांकाची विभागणी

मराठी :200
सामान्य अध्ययन 1 :200
सामान्य अध्ययन 2 :200
वैकल्पिक विषय 8 पेपर :1600

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )


महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील वर्ग 1 आणि2 अधिकारी निवडण्यासाठी राज्य पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे( MPSC )राज्यसेवा परीक्षा घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.पदवीच्या टक्केवारीची अट नसते.
पदवी परीक्षेतील रिपीट विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतो.
ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी किमान 19 आणि कमाल 33 वर्षे वय असावे लागते.
आरक्षित वर्गातल्या विद्यार्थांकरता कमाल वयोमर्यादा 33 +5=38 अशी आहे.
अपंगांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे.
विद्यार्थांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पोलीस खात्यातील भरतीसाठी आवश्यक ती शारीरिक पात्रताही विद्यार्थंाकडे असावी लागते.
मुख्य टपाल कार्यालयांमध्ये अर्जासह माहितीपुस्तिका 100 रुपयांना मिळते.
खुल्या वर्गासाठी परीक्षा फी -250 रु
मागासवर्गासाठी परीक्षा फी-125 रु
राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, विक्री कर अधिकारी , शिक्षणाधिकारी,मंत्रालय कक्षाधिकारी, गटविकास अधिकारी सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.
पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असतो त्याला सामान्य क्षमता चाचणी म्हणतात. त्यात विद्यार्थांने दोन तासांत 200 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात.
प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध असतात.
ही परीक्षा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात घेतली जाते.
पेपरच्या अभ्यासक्रम 12 आणि पदवीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.
ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.

1-पूर्वपरीक्षा
यात ऑप्शनल प्रश्न असतात.

2-मुख्य परीक्षा
वर्णनात्मक प्रश्न असतात.

3- मुलाखत

उमेदवारचे व्यक्तिमत्व,सामाजिक राजकीय प्रश्नांचा अभ्यास,आपल्या भोवताली घडणार्‍या घडामोडींबाबतची जागरुकता,त्यांची निर्णय क्षमता,प्रसंगावधान याची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात.
इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ?

आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.

एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ?

आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.

डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?

आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.

ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?

आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्याासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.
कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?

आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्‌ना या दोन्ही परीक्षा देता येतात.

हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला ?

आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.

अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?

आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.