जयंत विष्णू नारळीकर


जयंत विष्णू नारळीकर
**आपल्या देशात गणित तज्ञांची आणि खगोल वैज्ञानिकांची मोठी परंपरा आहे.आर्यभट्टपासून चालत आलेली ही परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे ती डॉ. जयंतनारळीकरांसारख्या थोर खगोल शास्त्रज्ञांनी. डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तरआहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत. कारण खगोल शास्त्रात महान संशोधनकरण्याबरोबरच त्यांनी मराठी-हिंदी साहित्यांत विज्ञान साहित्याची मोलाची भर टाकलीआहे.

**डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजीकोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील,विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदूविद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे.तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्यासंस्कृत विदुषी होत्या.

**डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनीविज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणिपी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचेटायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

**त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेडहॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनीकेंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी' नावाची जी स्वत:ची संस्था सुरूकेली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशीनिगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं.गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो`हॉईल-नारळीकर सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्टआईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हासिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्वकणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.

**दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाहमंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा वलिलावती.

**आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनालाआणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथीलटाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनपद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणूननियुक्त झाली.

**डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याच बरोबर मराठीसाहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचंमहत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेखआणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांचीदेणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

**त्यांनी लिहिलेल्या `वामन परत आला', `अंतराळातील भस्मासुर', `कृष्णमेघ', `प्रेषित', `व्हायरस', `यक्षाची देणगी', `टाईम मशीनची किमया', `याला जीवन ऐसे नाव'हे कथासंग्रह अत्यंत लोकप्रिय ठरले. शिवाय `आकाशाशी जडले नाते', `विमानाचीगरुडझेप', `गणितातील गमतीजमती', `विश्वाची रचना', `विज्ञानाचे रचयिते', `नभातहसरे तारे' ही विज्ञानातील माहितीपर पुस्तके म्हणजे मराठीतला जपून ठेवावा आणि नेहमीकाढून वाचावा असा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
 
**मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातीलपाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.
 
**त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली.त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक,एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्सजेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे तेसहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफसायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधीपारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिकलिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंगपारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मठ आहेत. आज चारदशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.

सी. डी. देशमुख


**चिंतामण द्वारकानाथ देशमुख ऊर्फ सीडी ही एक असामान्य बुद्धिमत्ता असलेली महान व्यक्ती होती. १४जानेवारी १८९६ साली रायगड जिह्यातल्या नाटा या गावी सीडींचा जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथदेशमुख मोठे नावाजलेले वकील होते. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सीडींनी कधीही पहिला नंबर सोडलानाही. मुंबई विद्यापीठाच्या मॉट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले. जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीपरीक्षेत ते पहिले आले. पुढे केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली, तिथे ते पहिले आले आणिआय.सी.एस. (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) या परीक्षेतही ते पहिले आले. 

**अशा असामान्य बुद्धिमत्तेचा ब्रिटिशांनी योग्य वापर करून घेतला नसता तरच नवल. सन १९२० मध्येम्हणजे वयाच्या २४व्या वर्षी ते आय.सी.एस. झाले. त्यांच्या करिअरची सुरुवात `सी. पी. बेरार स्टेट' (त्याकाळी मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांचे मिळून असलेले राज्य)चे उपायुक्त म्हणून झाली. भराभर पायर्‍याचढत १९३९ साली ते सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले. याच साली रिझर्व बँकेत लाएसन ऑफिसर म्हणून त्यांचीनेमणूक झाली. बँकेतील घडामोडींकडे लक्ष ठेवून त्या घडामोडींबाबत सरकारला माहिती देण्याचं महत्त्वाचंकाम त्यांच्यावर सोपविण्यात आलं. पुढे रिझर्व बँकेचे सेक्रेटरी, डेप्युटी गव्हर्नर आणि मग १९४३ साली तेभारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर झाले. रिझर्व बँकेचे गव्हर्नर बनणारे ते पहिले भारतीय होते. पुढे सहा वर्ष तेगव्हर्नर पदावर राहिले. तेथे त्यांनी स्वत:ची छाप सोडली. ते रिझर्व बँकेचे अत्यंत यशस्वी गव्हर्नर ठरले. रिझर्वबँकेच्या कारभारात त्यांनी असंख्य सुधारणा केल्या. अनेक पद्धतींमध्ये सुयोग्य बदल केले. बँकेच्या वार्षिकअहवालात भारताचं संपूर्ण वर्षाचं वित्तीय चित्र सादर करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. मुख्य म्हणजे मोठय़ाउद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी `इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची स्थापनात्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आली. देशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कर्ज देण्याचीसुविधा त्यांनी सुरू केली. देशातील कृषी उद्योगाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यांच्याअसामान्य बुद्धिमत्तेचा आदर राखून ब्रिटिश सरकारनं १९४४ मध्ये त्यांना `सर' ही पदवी बहाल केली.
**रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ब्रिटिशकाळातील भारतीय चलनी नोटांवर सी. डी. देशमुखांची सही छापण्यास सुरुवात झाली. चलनी नोटांवर सहीकरणारे सीडी हे पहिले भारतीय ठरले.
**पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचं प्रतिनिधित्व केलं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड(आय.एम.एफ.) येथेही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी आय.एम.एफ.च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचंअध्यक्षपदही भूषविलं.
**याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीनं पाऊलं उचलली जात होती. भारताला स्वातंत्र्यमिळालं, पण देशाला अत्यंत दुर्देवी अशा फाळणीला सामोरं जावं लागलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातीलमालमत्तेचं वाटप आणि देशावर असलेल्या कर्ज आणि इतर बोजा यांची विभागणी हे एक अत्यंत नाजूक कामहोतं. ते काम सीडींच्या देखरेखीखाली पार पडलं.
**१ जानेवारी १९४९ साली रिझर्व बँकेचं जे राष्ट्रीयीकरण झालं त्याचीही महत्त्वाची जबाबदारी सीडींवर होती.भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीसीडींना या योजनेत सामील करून घेतलं. भारताचा आर्थिक पाया मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनीकेलं. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचा आराखडाही त्यांनी तयार केला. लगेचच ते नेहरूंच्या केंद्रीय मंत्रीमंडळातवित्तमंत्री म्हणून रुजू झाले. भारतासारख्या विकसनशील देशाचा जलद आर्थिक विकास व्हावा, समाजालाआर्थिकदृष्टय़ा न्याय मिळावा आणि देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, या दृष्टीनं ते सतत प्रयत्नशीलराहिले. नवीन कंपनी कायदा, स्टेट बँका आणि आयुर्विमा कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण यामध्येही त्यांचामहत्त्वाचा वाटा होता.
**१९५६ सालापर्यंत ते नेहरूंच्या मंत्रीमंडळात वित्तमंत्री राहिले. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीला पाठिंबा देण्याच्या हेतूनं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
**अर्थात, त्यानंतरही त्यांची लोकसेवा आणि देशसेवा सुरूच राहिली. १९५६ ते १९६० दरम्यान त्यांनीयुनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अध्यक्षपद भूषविलं. भारतातील सर्व विद्यापीठांच्या दरम्यान समन्वय साधणंआणि विद्यापीठांचा दर्जा वाढविणं हे या कमिशनचं मुख्य काम होतं. १९६२ ते १९६७ दरम्यान ते दिल्लीविद्यापीठाचे कुलगुरू होते. खरं तर या काळापर्यंत ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ झालेले होते. अनेक बहुराष्ट्रीयकंपन्या आर्थिक सल्लागार त्यांची नेमणूक करायला तयार होत्या. तेथे त्यांना गलेलठ्ठ पगारही मिळालाअसता. एवढंच नव्हे, तर आय.एम.एफ.चे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचं निमंत्रणही त्यांना आलं होतं. पण तेनाकारून त्यांनी भारतातच राहण्याचं ठरवलं.
**सी. डी. देशमुखांचं व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी होतं. खरं तर ते विज्ञानाचे पदवीधर. पण नंतर ते अर्थकारणातशिरले. त्यांना जगातील सात भाषा उत्तमरित्या अवगत होत्या. ते बॅडमिंटनही चांगलं खेळायचे. रोजसकाळचा वेळी ते बागकाम करायचे. तत्त्वज्ञान हाही त्यांचा आवडीचा विषय होता. संस्कृत भाषेचे तर तेपंडितच होते. १९६९ साली त्यांच्या संस्कृत कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. केंद्र सरकारचे वित्तीयअंदाजपत्रक सादर करताना त्यांच्या भाषणामध्ये ते संस्कृत सुभाषितांची छान पेरणी करायचे. विरोधीपक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्यांची शैली अत्यंत विनम्र होती. आपला मुद्दा, आपले विचार स्पष्टपणेमांडण्यात ते वाक्बगार होते. त्यांचं वक्तृत्वही उत्तम होतं. सीडींच्या वक्तृत्वगुणाची आठवण म्हणून भारतीयरिझर्व बँकेनं १९८५ सालापासून `सी. डी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला' सुरू केली.
**त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि त्यांनी केलेल्या देशसेवेची सर्व थरांतून चांगली दखल घेतली गेली.त्यांना अक्षरश: असंख्य देशी-विदेशी सन्मान प्राप्त झाले. आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर असामान्य कामगिरी केल्याबद्दल १९५९ साली त्यांना व फिलिपिन्सच्या जोस ऍग्विलर यांनासंयुक्तपणे शासकीय सेवा या क्षेत्रातला मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९७५ साली त्यांनापद्मविभूषण या पदवीनं गौरविण्यात आलं.
सी. डी. देशमुखांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून स्वत:चं आरोग्यही उत्तम राखलं होतं.त्यामुळे त्यांना दीर्यायुष्य लाभलं. वयाच्या ८७ व्या वर्षी म्हणजे १९८२ साली हैदराबाद येथे त्यांचं निधन झालं