इंग्रजी कादंबरीकार म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक! त्यांनी लिहिलेल्या ‘द प्रिन्सेस’ या कादंबरीला अमेरिकेत प्रतिष्ठेचे पारितोषिक लाभलेले होते.
त्यानंतरही त्यांनी अनेक इंग्रजी कादंबऱ्या, लघुकथा, इतिहास आणि प्रासंगिक विषयांवर प्रदीर्घ लिहिले आहे.
‘ए बेंड इन दि गँजेस्’ ही फाळणीच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेली कादंबरीही त्या काळी खूप गाजली. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे मराठीत अनुवादही झाले आहेत.