संत गाडगेबाबा
**गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव. ते परीट समाजातले होते, हेमुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाही, त्यामुळं ते अमुकसमाजातले होते, असं कसं म्हणता येईल?त्यांचं आडनाव जानोरकर असं होतं. त्यांच्यावडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.
**लहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत. घरची परिस्थिती, त्यामुळं मामाचीगुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेला. अशाबिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार ? मात्र, कष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीचीकामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागले. शेतकरी- कामकरी यांना किती कष्ट नि परिश्रमकरावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं, याचीही कल्पना त्यांना येतगेली. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं व जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खंत्यांना तीव्रतेनं जाणवली. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाकाजी, धर्माविषयीच्याचुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं, याचीही त्यांना जाणीवहोऊ लागली. अशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली.समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण व समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत,बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताहीत्यांना तीव्रतेनं भासली. यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणंगाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.
**समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयता, त्याचप्रमाणंदेवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले व प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायलाहवेत, या त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्यामाध्यमातून या कार्यास प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच माणूसघडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, या मताचापुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. ज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्याशाळांसाठी आपल्या जागा दिल्या. जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. कीर्तनाच्याप्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, त्या माणसाचीच आपणसेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवरकेले.
देवकीनंदन गोपाला, गोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.
**बाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत. आज सामान्यमाणसाला, मजूरांना, शेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत, मग आपणहीत्यांच्यासारखंच राहायला नको का? हा विचार यामागं असावा. महाराष्ट्रातील धर्मविचारनितळ, निकोप, निष्कलंक, निरपेक्ष, शुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली.नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचाकेंद्रबिंदू होता, गाभा होता. त्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केले. धर्माचंअत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलं. जुन्या वाईट प्रथा, रुढी यांना प्रखरविरोध केला. धर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच्छतेसाठी जागोगाग प्रसारकेला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रशासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं व त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छतापुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.