****भारतरत्न महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रोवणारे क्रियाशील समाजसुधारक.
**कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची.
***आपल्या गावी सार्वजनिक कामे व्हावीत म्हणून त्यांनी 'मुरुड फंड' योजना सुरू केली होती
***अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते.
**सन १८९७ मध्ये "विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळा"ची स्थापना त्यांनी केली. तसेच पुण्याला पेरु गेटजवळ "अनाथ बालिकाश्रम मंडळा"ची स्थापना करून त्या प्रकल्पाला स्वतः पाच हजार रुपयाची देणगी दिली. पुढे १९०० मध्ये श्री गोखले यांनी आपली हिंगणे येथील जागा आश्रमाला विनामूल्य दिली. हाच "हिंगणे महिलाश्रम". त्यांनंतर"महिलाश्रम हायस्कूल", "पार्वतीबाई अध्यापिका शाळा", "आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा" अशा संस्था महाराष्ट्रात निर्माण झाल्या.
**त्याकाळात बालविधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी 1900 मध्ये विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली.
**अण्णांनी 1904 साली हिंगणे येथील माळावर सहा एकर जागा मिळविली. तेथे छोटेसे घर बांधून अनाथ बालिका व निराधार विधवांसाठी वसतिगृह बांधले. ते स्वतही तेथेच राहू लागले. त्यांचे हे घर म्हणजे दुर्दैवी स्त्रियांचे माहेरघर होते. अण्णांनी या निराधार स्त्रियांसाठी तेथे प्राथमिक व माध्यमिक शाळा काढली. पुढे महिलांसाठी महाविद्यालय व महिला विद्यापीठाची स्थापना ही केली. विद्यापीठाचे संघटनात्मक काम स्वत अण्णा जातीने बघत असत. हे विद्यापीठ प्रथम पुण्यास होते. विद्यापीठासाठी विठ्ठलदास ठाकरसी यांनी मोठी देणगी दिली. त्यामुळे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) असे नाव देण्यात आले. हे विद्यापीठ पुण्याहून मुंबईस आले. सरकारची विद्यापीठाला मान्यता मिळाली. भारतातील हे पहिले महिला विद्यापीठ आहे...........!!!!!
**मध्यंतरीच्या काळात अण्णांच्या पत्नी निवर्तल्या. त्यानंतर त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहामुळे मुरूड गावानी अण्णांना वाळीत टाकले होते. अण्णा शतायुषी झाले. त्यावेळेस मात्र याच गावानी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. यातच अण्णा, त्यांचे कार्य याची थोरवी लक्षात येते...!!1
**महिला स्वावलंबी व्हाव्याम्हणून त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण देणाऱया संस्था त्यांनी पुणे, मुंबई, वाई, सातारा इत्यादी अनेक ठिकाणी काढल्या. महिलांच्या उद्धारासाठी झटणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी 1910 मध्ये निष्काम मठ स्थापन केला.
**1936 साली ग्रामीण शिक्षणासाठी "महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ" स्थापन केले.
**अस्पृश्यता निवारणासाठी 1944 मध्ये "ग्रामाशिक्षण मंडळ" व "समतासंघ" स्थापन केला.
**आज मुरुड या त्यांच्या जन्मगावी अण्णांच्या घरात 'कर्वे वाचनालय' सुरु करण्यात आले आहे.
**भारत सरकारने त्यांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिटही काढले."भारतरत्न" व "पद्मविभूषण"या गौरवशाली पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले
***त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. अण्णासाहेब कर्वे यांचे वयाच्या 104 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 1962 रोजी निधन झाले...!!!!
***र.धों. कर्वे यांची ग्रंथसंपदा -
संततिनियमन,गुप्त रोगांपासून बचाव,वेश्याव्यवसाय,आधुनिक आहारशास्त्र,आधुनिक कामशास्त्र,त्वचेची निगा ,संतति नियमन - विचार व आचार इ.......!!!