!!!!!!आनंदोत्सव होळीचा !!!!!


!!!!!!आनंदोत्सव होळीचा !!!!!
**महाराष्ट्र राज्य हे सहयाद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वतराजीत असलेलं प्रगतीच्या वाटेवरील एक राज्य. याच सातपुडा पर्वताच्या द-याखो-यातील विस्तीर्ण अशा वनश्रीनं नटलेलं मेळघाटचं अरण्य. निसर्गसख्यांचं माहेर. कारण येथे आहेत साग वृक्षांची आभाळाशी स्पर्धा करणारी झाडं. त्यामध्ये आहे वाघ, बिबट,अस्वल,रानकुत्रे,सांबर इ. वन्यप्राण्यांचे आश्रयस्थानं.

**“कोरकू” ही आदिवासी जमात याच मेळघाटात आहे. ही जमात “मुंडा”किंवा “कोलारीयन” वंशाशी संबंधीत आहे. अर्थात काही ठिकाणी “कोरवा” हया नावाने ओळखल्या जाते. मध्य प्रदेशातील होशंगाबाद,निमार आणि बैतूल जिल्हयात तर अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील अतिदुर्गम भागात या जमातीचे वास्तव्य आहे. धार्मिक आणि मंत्रतंत्रावर विश्वास ठेवणारे हे लोक असून महादेव ही त्यांची प्रमुख देवता आहे. जंगलाचा राजा वाघालाही ते पुजनीय मानून त्याची पूजा करतात. म्हणून वाघाला ते “कुलामामा” असं म्हणतात. त्यामुळं हा आदिवासी वाघाची कधीच शिकार करत नाही.

**कोरकुंचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. डोंगराच्या उतरंडीवर ते आपली शेती पिकवितात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली आदिवासी गाव आणि सुटसुटीत मोकळया जागेत उभारलेली कुडाची साधी घरं गावरस्त्याच्या दोनी बाजूने एका रांगेने असतात. धोतर, कुर्ता आणि डोक्यावर पागोटं असा पुरुषांचा पोषाख असतो. स्त्रीया साडया परिधान करतात.

**“कोरकू” वर्षभरात विविध सण-उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपारिक महत्वाचा सण आहे. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी या सणानिमित्त आपआपल्या गावी परत येतात. होळी सणाची तयारी कोरकु खूप दिवस अगोदर सुरु करतात. नवनी कपडे, दागदागिने खरेदी केली जातात. घराची साफसफाई करुन सडासंमार्जन करुन घरं सजविली जातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नृत्य करण्यासाठी आवश्यक ढोल,ताशे,टिमकी, बासरी इ.साहित्य साफसुधरी केली जातात.

**होळीचा हा पाच दिवसाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून “भिमला” नावाचा उपासना विधी साजरा केला जातो. गावातली जाणती ज्येष्ठ मंडळी जंगलात जाऊन टेंभूर्णीच्या झाडाची पूजा करतात. या झाडाची फांदी तोडून ते गावात आणतात. ज्या स्थानावर होळी रचावयाची असते तेथे ही फांदी जमिनीत गाडतात. त्यानंतर त्याभोवती होळी रचली जाते. त्यात पाच बांबू रोवून त्यांच्या टोकावर पळसाची फुलं ,केसा,डहाळया,पु-या, चपाती आदी सामग्री बांधतात. यालाच होळीचा शृंगार मानला जातो. बांबूभोवती तुराटया, पराटया आणि लाकडं व्यवस्थित रचली जातात.

**“मुठवा” हा कोरकूंच्या गावाचा देव आहे. संध्याकाळी गावातले आबालवृध्द स्त्री-पुरुष या देवाजवळ जमा होतात. परंपरागत “फगनय नृत्य” करत ते मिरवणुकीनं गाव पाटलाच्या घरी जातात. पाटलाची बायको या मिरवणुकीला गुलाल लावून ओवाळते. तेथून ही मिरवणुक वाजत गाजत मुठवा देवाजवळ येते. पाटलाची बायको देवाजी पूजा करते. वाटेवरच्या इतर देवतांची पूजा करण्यात येते. मिरवणुकीतले लोक एकमेकांना गुलाल लावत प्रेमाने भेटतात. आदिवासींचा रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या मोहापासून काढलेलं “सिड्डू” हे मद्य प्राशन करतात. मग ही मिरवणूक होळीच्या ठिकाणी जाते. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुष मिळून हातात हात घालून सामुहिक नृत्य करतात. स्त्रीया गळयात सळी,कर्णभूषणं,हातात पाटल्या,कमरीवर करगोटा आणि पायात तोडे घालून नृत्य करत असतात. गावच्या पाटलाची बायको होळीची पूजा करते आणि होळी पेटविल्या जाते. होळी पेटल्यावर बांबू जळून खाली पडणं अशुभ मानतात. म्हणूनकाही लोक बांबू आपल्या खांद्यावर झेलतात. बांबूचे पाच तुकडे करुन ते परत होळीत टाकतात.

**होळी संपूर्ण पेटल्यानंतर कोरकू मुठवा देवाजवळ एकत्र जमतात. आडवा दोर धरुन स्त्रीया पुरुषांना अडवून “फगवा” मागतात. फगवा मिळाल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत. याही वेळी स्त्री-पुरुष विशिष्ट प्रकारची गीतं गात नृत्य करत असतात. याला “होरयार नृत्य” असं म्हणतात. त्यानंतर पुरुष मंडळी एका भांडयात पैसे टाकतात. यालाच “फगवा” असं म्हणतात. त्यानंतर पुरुषांना जायला रस्ता दिला जातो. गावपाटलाच्या भेटीला हे सर्व लोक जातात. भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर नृत्य सुरु करतात.

**निसर्गपूजक आणि पर्यावरण रक्षक कोरकु आदिवासी, पळसाच्या झाडांच्या फुलांपासून रंगपंचमीस रंग तयार करतात. भांडयात फगवा टाकल्याशिवाय रंग लावायला परवानगी नसते. फगवा टाकल्यावरच रंग पंचमीला खरी सुरुवात होते. इथंही लोक नृत्य करतात.कोरकू आदिवासी स्वत:ला रावणवंशी मानतात. रावणाचा मुलगा “मेघनाथ” हा सर्व देवतांना जिंकणारा महापराक्रमी देव असं कोरकू मानतात आणि म्हणूनच होळीच्या दुस-या दिवशी खांबाची म्हणजेच पर्यायानं मेघनाथची पूजा ते करतात. त्याला नवसाचं कोंबडं बळी देतात. बळी देण्यापूर्वी त्या कोंबडयाचीही पूजा होते. कोंबडयावर पाणी शिंपडल्यावर ते फडफडलं की नवस कबूल केला असं म्हणतात.

**अशा त-हेनं सातपुडा पर्वतराजीच्या मेळघाटातला कोरकू आदिवासी आपल्या परंपरागत पध्दतीनं होळीचा हा सण साजरा करतात. पंचमीच्या दिवशी होलिकोत्सवाची सांगता होते. या दिवशी मद्यप्राशन करणं पवित्र समजलं जातं. शिशिर ऋतुच्या पानगळीत होळीचा अनोखा रंगोत्सव मेळघाटातील आदिवासी कोरकुंच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरत असतो ते ऋतूराज वसंतच्या स्वागतासाठी.!!!!!!

जे आर डी टाटा


जे आर डी टाटा
**पहिले भारतीय वैमानिकभारताच्या हवाई उद्योगाचे जनकभारतातील अग्रगण्यउद्योजकआपल्या कामगारांचे आणि कर्मचार्यांचे हित जपणारा सहृदय उद्योजक... अशाकितीतरी विशेषणांनी जहांगीर रतनजी दादाभॉई उर्फ जे आर डी टाटा यांचे वर्णन करतायेईल.

**जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरीस (फ्रांसयेथे झालारतनजी दादाभॉय टाटायांचे ते द्वितीय पुत्रमुंबईतील कॅथेड्रल ऍण्ड जॉन केन्नॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले,पण जेआरडींची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यतफ्रांसमध्येच गेलेकाहीकारणाने ते मॅट्रीकच्या पुढे शिकू शकले नाहीत.

**इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईसब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होतेत्यामुळे त्यांनीही विमानशिकण्याचा ध्यास घेतलासन १९२९मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला.वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होतलगेचच १९३२ साली त्यांनी `टाटाएअरलाईन्सया पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केलीपुढे१९४६ साली त्याचे नाव बदलून `एअर इंडियाकेले गेले.
वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते `टाटा सन्स'चे चेअरमन झाले.त्यानंतर ते प्रदीर्घ काळ त्या पदावर विराजमान होतेत्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटासन्सच्या १४ कंपन्या होत्याजेआरडींच्या काळात ९१ कंपन्यांची त्यांनी भर टाकलीअनेकवेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी टाटा समूहाचा विस्तार केला रसायनवाहनचहामाहिती,हॉटेल्स आणि तंत्रज्ञान अशी अनेक नवीन क्षेत्र त्यांनी टाटा समूहासाठी खुली केलीएक एकक्षेत्र पादाक्रांत करीत असताना त्यांनी कोठेही नीतिमत्ता सोडली नाहीसर्व व्यवहारसचोटीने आणि पारदर्शकपणे करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.
उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनात कामगारांचे म्हणणेही ऐकले जावेअसे जेआरडींचेमत होतेजेआरडींच्या पुढाकाराने १९५६मध्ये कामगारांच्या कल्याणासाठी खास योजनाराबविण्यात आलीत्यामध्ये `दिवसातून आठ तास काम', `मोफत आरोग्य सेवा', `भविष्य निर्वाह निधीआणि `अपघात विमा योजनाअशा पायाभूत गोष्टींचा समावेशकरण्यात आला होतापुढे ही योजना भारत सरकारने सर्व उद्योग-व्यवसायांसाठीकायद्याने बंधनकारक केली.

**एवढेच नव्हेतर कामगार किंवा कर्मचारी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतरत्याची संपूर्ण जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारलीत्यामुळे वाटेत जर त्याचे काही बरे-वाईटझालेतर त्याचीही जबाबदारी कंपनीने स्वीकारायला सुरुवात केली.
जेआरडींच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापनझाल्याभारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफसोशल सायन्सेस आणि १९४५ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापनाकेलीआशियातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल १९४१ साली मुंबईत सुरू केले.

**जेआरडींना अनेक पारितोषिके मिळालीभारत सरकारतर्फे त्यांना १९५७ साली`पद्मविभूषण'नी सन्मानित करण्यात आलेतर १९९२ साली त्यांना `भारतरत्नहा सर्वोच्चभारतीय सन्मान बहाल करण्यात आलावयाच्या ८९व्या वर्षी२९ नोव्हेंबर १९९३ सालीजिनेव्हा (स्विट्झरलंडयेथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
**भारत हा खेड्यांचा देश आहेहे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईलअशी त्यांचीश्रद्धा  विचारसरणी होतीत्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईलयाविषयी अहर्निशकाळजी वाहिलीचिंता केलीग्रामोन्नती  ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होतीत्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविधसमस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला  त्या कशा सोडवाव्यातयाविषयी उपाययोजनाही सुचविलीयाउपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्याहे आज(त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्याविनंतरच्या काळातहीतीव्रतेनं जाणवतंयातून राष्ट्रसंतांच द्रष्टेपणव्यक्त झालं आहे.
**अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे,त्याचप्रमाणं ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पाग्रामगीता ही जणूतुकडोजी महाराजांची वाङमयीन पूर्तीच होयस्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जीभिक्षा घेतत्यावरच आपण बालपणी जीवन कंठिलंही त्यांची श्रद्धा होतीत्यांचं मूळनाव माणिक होतं पणत्यांचं हे नाव त्यांच्या गुरूंनी अडकोजी महाराज यांनीच योजिलं होतं.
**खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईलयाविषयीची त्यांनी उपाययोजना सुचविलीती अतिशय परिणामकारकठरलीग्राम हे सुशिक्षित व्हावंसुसंस्कृत व्हावंग्रामोद्योग संपन्न व्हावंगावानेच देशाच्या गरजाभागवाव्यातग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावंप्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावंअशीही त्यांचीनिष्ठा होतीतिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं आहेदेवभोळेपणाअंधश्रद्धा जुनाट कालबाह्य रूपी नाहीशाव्हाव्यातयाविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
**सर्वधर्मसमभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचं एक वैशिष्ट्यच होतंत्यासाठी त्यासामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
**एकेश्वरवाद ही त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतूनच पुरस्कारला होताधर्मातील अनावश्यक कर्मकांडालात्यांनी फाटा दिलाआयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातूनत्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार पुरस्कार करुन आध्यात्मिक , सामाजिकराष्ट्रीय प्रबोधनकेलेस्वातंत्र्याच्या चळवळीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण व्हावीयासाठी त्यांना कारावासही भोगावालागलाअखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधूसंघटनेची स्थापना केलीगुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखास्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केलीगुरुकुंजाशी संबंधितअसलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचं हे कार्य अखंडव्रतासारखं चालवीत आहेत.
**महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलूकुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्थाराष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असतेहे त्यांनी आपल्या किर्तनांद्वारे समाजालापटवून दिलंत्यामुळं स्त्रीला अज्ञानात  दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहेहे त्यांनी अत्यंत प्रभावीपणेपटवून दिलं.
**देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं  राष्ट्राचं संरक्षणकरु शकतीलते नीतिमान  सुसंस्कृतयुक्त कसे होतीलयाविषयीचं उपदेशपर  मार्गदर्शनपर लेखन त्यांनीकेलंव्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
**ऐहिक  पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहेत्यांनी मराठीप्रमाणंच हिंदीभाषेतही विपुल लेखन केलंआजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहेयावरुन त्यांच्यासाहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेतयाची सहज कल्पना येईलराष्ट्रपतिभवनात त्यांचेखंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं