जयंत विष्णू नारळीकर


जयंत विष्णू नारळीकर
**आपल्या देशात गणित तज्ञांची आणि खगोल वैज्ञानिकांची मोठी परंपरा आहे.आर्यभट्टपासून चालत आलेली ही परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे ती डॉजयंतनारळीकरांसारख्या थोर खगोल शास्त्रज्ञांनीडॉनारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तरआहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेतकारण खगोल शास्त्रात महान संशोधनकरण्याबरोबरच त्यांनी मराठी-हिंदी साहित्यांत विज्ञान साहित्याची मोलाची भर टाकलीआहे.

**डॉनारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकरत्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजीकोल्हापूर येथे झालागणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालात्याचे वडील,विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होतेवाराणशी येथील बनारस हिंदूविद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होतेडॉनारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे.तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालात्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्यासंस्कृत विदुषी होत्या.

**डॉनारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झालेतेथूनच सन १९५७ साली त्यांनीविज्ञानाची पदवी प्राप्त केलीया परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलात्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेलेतेथे त्यांना बी.एम.आणिपी.एचडी.च्या पदव्या मिळाल्यात्या काळात त्यांना रँग्लर ही पदवीखगोलशास्त्राचेटायसन मेडल  इतर अनेक बक्षिसे मिळाली.

**त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडीकेलीसर फ्रेडहॉईल डॉनारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेत्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनीकेंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमीनावाची जी स्वत:ची संस्था सुरूकेलीत्यात डॉनारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता१९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशीनिगडीत होतेसर हॉईल आणि डॉनारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं.गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडलातो`हॉईल-नारळीकर सिद्धांतया नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहेअर्ल्बर्टआईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहेहासिद्धांत असे सांगतो कीवस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्वकणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.

**दरम्यान डॉनारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाहमंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झालात्यांना तीन मुली आहेत - गीतागिरिजा लिलावती.

**आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनालाआणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतलेत्यांनी मुंबई येथीलटाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनपद स्वीकारलेकालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणूननियुक्त झाली.

**डॉनारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतचपण त्याच बरोबर मराठीसाहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातलीविज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचंमहत्त्वाचं काम केलंसामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेखआणि कथा लिहिल्यायासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतातत्यांच्या `यक्षांचीदेणगीया पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

**त्यांनी लिहिलेल्या `वामन परत आला', `अंतराळातील भस्मासुर', `कृष्णमेघ', `प्रेषित', `व्हायरस', `यक्षाची देणगी', `टाईम मशीनची किमया', `याला जीवन ऐसे नाव'हे कथासंग्रह अत्यंत लोकप्रिय ठरलेशिवाय `आकाशाशी जडले नाते', `विमानाचीगरुडझेप', `गणितातील गमतीजमती', `विश्वाची रचना', `विज्ञानाचे रचयिते', `नभातहसरे तारेही विज्ञानातील माहितीपर पुस्तके म्हणजे मराठीतला जपून ठेवावा आणि नेहमीकाढून वाचावा असा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
 
**मराठीच नव्हेतर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातीलपाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.
 
**त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली.त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले१९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आलेशिवाय डॉभटनागर स्मृती पारितोषिक,एम.पीबिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्सजेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झालेलंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे तेसहाधिकारी आहेततर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफसायन्सेस चे ते अधिछात्र आहेतइंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधीपारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहेवैज्ञानिक विषयांत साहित्यिकलिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंगपारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मठ आहेतआज चारदशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.