भारतातील बंदरे


***भारतास पूर्व आणि पश्चिम किनारा मिळून एकंदर ६,१०० किमी. लांबीची किनारपट्टी लाभली असली, तरी हा किनारा दंतुर नसल्याने आणि गाळाने भरण्याची शक्यता जास्त असल्याने त्यावर बंदरे जास्त नाहीत. शिवाय पूर्व किनार्‍यावर ईशान्य मॉन्सून व पश्चिम किनार्‍यावर नैऋत्ये मॉन्सून वार्‍यांपासून होणार्‍या वादळांचा त्रास बराच होतो. तरी देखील लहान मोठी मिळून एकूण १७६ बंदरे आहेत. चार हजार टनांपेक्षा मोठी सागरी जहाजे सुरक्षित उभी राहू शक्तील असे धक्के असलेली व प्रतिवर्षी दहा लाख टनांपेक्षा जास्त व्यापारी मालाची उलाढाल करणारी बंदरे ही मोठी बंदरे म्हणून ओळखली जातात.
**भारतात पश्चिम किनार्‍यावर कांडला, मुंबई, मार्मागोवा, मंगलोर व कोचीन आणि पूर्व किनार्‍यावर तुतिकोरिन, मद्रास, विशाखापटनम, पारा दीप, कालिकत व हल्डिया अशी एकूण ११ मोठी बंदरे आहेत. इतर बंदरांचे मध्यम व लहान असे प्रकार केलेले असून त्यांची एकूण संख्या १६५ आहे.
1)कालिकत
हुगळी नदीच्या डाव्या किनार्‍यावर वसलेले कालिकत बंदर नदीच्या मुखापासून १३३ किमी आत आहे, पश्चिम बंगाल, आसाम ,बिहार, ओरिसा, उत्तरे प्रदेश मध्य प्रदेश, नेपाळ व भूतान यांचा बाहेरच्या जगाशी व्यापार या बंदरातून होतो. नदीतील वळणांमुळे रेतीचे बांध नदीत नैसर्गिक रीतीने होणे कायम चालू असते, त्यामुळे नदीचे सर्वेक्षण करणे व गाळबोटीने गाळ काढून टाकणे ही कामे कायम चालू असतात. बंदराधिकारी सर्वेक्षण करुन नदीत पाण्याची खोली किती असेल हयाची माहिती सहा आठवडे आधी जहाज कंपन्यांना पुरवितात. नदीस वळणे असल्याने साधारणत : १५२ मी. पेक्षा जास्त लांबीचे जहाज बंदरात येऊ शकत नाही. तसेच प्रत्येक जहाजावर मार्गदर्शक असल्याशिवाय जहाज बंदात येऊ शकत नाही, तसेच प्रत्येक जहाजावर कलकत्यास मुसळी लाट येत असलयाने धक्क्याशी ५.५ ते ६ मी. पाण्याचा डुबाव लागणारी जहाजेच बांधतात.

2)हल्दिया
हुगळी नदीच्या बदलत्या पात्रामुळे व गाळाने भरुन जाण्याच्या प्रवृत्तीमुळे कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरास जोडबंदर असण्याची आवश्यकता सु. १०० वर्षापूर्वीच जाणवली होती. त्या दृष्टीने डायमंड हार्बर, लफ पॉइंट, गेओनखाली, सौगोर बेअ इ. सर्व जागांचा विचार करण्यात आला. पण १२ ते २१ मी. गाळ काढणे ही एक खर्चिक बाब होती फराक्का धरणामुळे कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरात पुरेसे खोल पाणी मिळणार असले तरी मोठया जहाजांची वाढती वहातूक व कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरातील गाळ साठण्याची प्रवृतती लक्षात घेऊन एका जोडबंदराची आवश्यकता त्याच्या दक्षिणेकडील ६५ किमी. अंतरावरील हल्दियाने पूर्ण झाली आहे. हुगळीतील भरती ओहोटीच्या स्थितीनुसार तयार केलेल्या व ३ सरकते कुसुलांचे दरवाजे असलेल्या जगातील अशा तर्‍हेच्या सर्वात मोठया जलपाशाने साठविलेल्या पाण्याचे हल्डिया हे बंदर आहे.

3)पारादीप
कालिकत व विशाखापटनम या बंदरांच्या मध्ये वसलेले, खोल पाण्याची सोय असलेले हे उत्कृष्ट बंदर आहे. ओरिसातील लोह धातुक क्रोम ,ग्रॅफाईट , मॅंगॅनीज, दगडी कोळसा वगैरे खनिजांच निर्यातीसाठी मुख्यता: या बंदराचा विकास करण्यात आला. अशुध्द क्रोम निर्यात करणारे भारतातील हे एकमेव बंदर आहे. १९६५ मध्ये मोठे बंदर म्हणून घोषित झाल्यावर याचा विकास झपाटयाने झाला.

4)विशाखापटनम
भारताच्या पूर्व किनार्‍यावरील मद्रास व कालिकत या दोन बंदराच्या मध्ये, आंध्र प्रदेशातील मेघाद्री गेड्डा नदीच्या मुखावर वसलेले हे एक महत्वाचे बंदर आहे. या बंदराच्या बांधकामास १९२२ साली सुरुवात होऊन १९३३ साली त्याचा प्रत्यक्षात वापर सुरु झाला आणि १९६४ साली ते मोठे बंदर म्हणून घोषित झाले.
नदीमुखाच्या दोन्ही अंगांस टेकडया असल्यामुळे बंदराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले आहे. बंदरास १.६२ किमी. लांबीचे सु. ९५ मी. रुंदीचे व सु. ११ मी. खोलीचे प्रवेश पात्र असून प्रवेशद्वारापाशीच जहाजे वळविण्यासाठी ३६६ मी. व्यासाचे क्षेत्र उपलब्ध आहे.

5)तुतिकोरिन
पूर्व किनार्‍यावरील वार्‍यावादळापासून संपूर्ण सुरक्षित व उधाणाच्या भरतीचा उपद्रव जवळजवळ होत नसलेले हे बंदर दक्षिण भारताच्या व्यापारी गरजांसाठी विकसित करण्यात आले आहे. प्राचीन काळापासून बंदर म्हणून उपयोग होत असला, तरी १८१५ साली पहिला धक्का बांधण्यात येऊन मध्यम प्रतीचे बंदर म्हणून याचा उपयोग होऊ लागला. बंदराचा विकास करण्याचे प्रत्यक्ष काम १९६० साली सुरु झाले. आणि १९६८ मध्ये त्याला जोराची चालना मिळाली. वाहतुकीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन जुन्या लहान बंदराला लागून मोठया बंदाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार तुतिकोरिन हे उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूंस दगडी ढिगार्‍याचे बांध घालून बांधलेले कृत्रिम बंदर होणार आहे. बंदराचे १२२ मी. रुंदीचे प्रवेशद्वार पूर्व धक्क्यात असून बंदराचे जलाशय क्षेत्र ३८४ हेक्टर आहे. उत्तरेकडील बांध हा जगातील अशा तर्‍हेचा सर्वात मोठा बांध आहे.

6)कोचीन
आपल्या महापुरामुळे केरळची 'अश्रुनदी ' म्हणुन समजल्या जाणार्‍या पेरियर नदीने १३४१ साली आपले पात्र वळवून सध्याच्या एर्नाकुलम शहराच्या समोरच नदीचे नवे मुख आणले आणि या बंदराची उभारणी शक्य झाली. सोळाव्या शतकापासून पोर्तूगीज, डच व नंतर ब्रिटिश असे या बंदराच्या मूख्य अभियंत्यांनी विलिंग्डन बेअ व समुद्र यांतील खडकांचा अडथळा ५.६ किमी. लांबीच्या, १३५ मी. रुंदीच्या व ९ मी. खोलीच्या कालव्याने दूरकेला व बंदराचा भर समुद्राशी संबंध प्रस्थापित झाला. नंतर बेट व मुख्य भूमी जोडणारे पूल, रस्ते व रेल्वे झाले.

बंदरात १२ धक्के व ४ क्वे असून कोळसा व तेल यांसाठी प्रत्येकी एकएक स्वतंत्र धक्का उत्तरेस व दिक्षणेस आहेत. उतारुंसाठी मध्येपाद आहे. पश्चिमेकडील मूट्टॅनचेरी पात्रात १३ व एर्नाकुलम पात्रात ३ जहाजे उभी राहू शक्तील अशी नौबधांची सोय आहे. बंदरातील तेल धक्क्याशी ८५,००० टन भाराची व १२ मी. डुबावाची तेलवाहू जहाजे उभी राहू शकतात.

7)मुंबई
भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील व माहाराष्ट्र राज्याची राजधानी असलेले हे बंदर एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते. मुंबई हे एक बेट असून मुख्य भूमीशी रेल्वे व हमरस्ते यांनी ते जोडले गेलेले आहे. बेटाच्या पूर्व बाजूस बंदर वसलेले आहे. कुलाब्याच्या नैसर्गिक लाटारोधक बांधामुळे १,८४० हेक्टर क्षेत्राचे शांत बंदर तयार झाले आहे. ओहोटीच्या वेळीसुध्दा बंदरात ९ मी. खोल पाणी मिळू शकते. या भागात तुर्भे, बुचर व एलेफंटा ही बेटे मुख्य बेटाच्या पूर्वेस ठाण्याच्या खाडीत आहेत. सुएझ कालव्यामुळे जलवाहतुकीत एकदम क्रांती झाली आणि मुंबई बंदरास महत्व प्राप्त झाले. कुलाब्याच्या ससून गोदीपासून १८७५ मध्ये मुंबई बंदराची सुरुवात झाली. त्यांनंतर १८८० साली प्रिन्सेस गोदी, १८८८ साली व्हिक्टोरिया गोदी व १९१४ साली अलेक्झांड्रा गोदी बांधून पुरी करण्यात आली. हयांशिवाय बॅलराड पिअर, तुर्भे बेटावर पीरपाव, बुचर बेट, भाऊचा धक्का इ.

8)कांडला
पश्चिम किनार्‍यावर गुजरातच्या कच्छ भागातील कांडला खाडीच्या पश्चिम किनार्‍यावर भर समुद्रापासून सु. २९० किमी. आत वसलेले हे अगदी पश्चिम व उत्तरेकडील मोठे व संरक्षित बंदर आहे. संस्थानी स्पर्धेतून १९३० साली पहिली कॉक्रीटची जेटी बांधून कच्छच्या महाराजांनी या बंदराची सुरुवात केली. १९४७ साली झालेल्या हिंदूस्थानच्या फाळणीनंतर मुंबईच्याउत्तरेस मोठे बंदर न राहिल्याने या बंदराचा विकास करण्याचे ठरुन १९५३ साली कामास सुरुवात होऊन १९५७ मध्ये बंदर वाहतूकीस खुले झाले.
कांडला बंदर खाडीवर खूप आत असल्याने व पाणी खोल असल्याने लहरी निसर्गाचा तेथे उपसर्ग पोहचत नाही. एका वेळी ५ जहाजे लागू शक्तील एवढा मोठा १,१६५ मी. लांबीचा व ९.६ मी. खोलीचा धक्का आहे. बंदरात ६ जहाजे नागंरता येतील अशा लांबीचे छोटे धक्केही बांधण्यात आले आहेत. यांपैकी एक मिठासाठी, एक स्फोटक पदार्थासाठी, एक जहाज नांगरुन ठेवण्यासाठी व इतर ३ मालासाठी असून तेथे ७ ते १२ मी. खोल पाणी असते तेल व द्रवरुप रसानयांसाठी एकूण ३४१ मी. लांबीचे दोन धक्के आहेत. नदी बंदर विभागात लहान गलबतांसाठी व अवजड माल हाताळण्यासाठी ३ धक्के बांधण्यात आले आहेत. मच्छीमारीसाठी शीतगृहाची सोय असलेला एक स्वतंत्र धक्का आहे. खाडीतील गाळ काढून एक तरता धक्का व तरती निर्जल गोदी असून ७३ मी. लांब व ३.४ मी. डुबावाची जहाजे येथे दुरुस्त करता येतात. खाडीतील गाळ काढून पाण्याची पूरेशी खोली ठेवण्यासाठी २,५०० टन भाराच्या गाळबोटी आहेत. बंदरात संक्रमण कोठारे व माल साठविण्याची गुदामे आणि माल चढविण्याच्या उतरविण्याच्या यांत्रिक सोयी आहेत.

महात्मा फुले


महात्मा जोतिबा फुले


**मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्‍हे हे मूळ आडनाव.
**ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

**१८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा

**१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.

**१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

**१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

**१८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

**१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

**१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

**१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

**सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

**१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

**मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

**नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतफर्े विश्रामबाग वाड्यात सत्कार.

**१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.

**१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

**१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.

**१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

**१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

**१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

**१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

**१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

**१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

**१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

**१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

**१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

**१८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

**१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

**१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

**१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

**१८८७ - सत्यशोधक समाजातफर्े नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली

**१८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

**१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.

*******ज्योतीरावांची ग्रंथसंपदा - नाव साहित्यप्रकार लेखन काळ

१) तृतीय रत्न नाटक १८५५

२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९

३)ब्राह्मणांचे कसब १८६९

४)गुलामगिरी १८७३

५)शेतकर्‍यांचा आसूड १८८३

६)सत्सार १ सत्सार २ १८८५

७)इशारा १८८५

८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )

९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर


आंबेडकर भीमराव रामजी


**(१४ एप्रलि १८९१ - ६ डिसेंबर १९५६)
**एक थेार भारतीय पुढारी अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्हाचे मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्याचे मुळ गाव त्याचे वडिल रामजी सकपा हीे लष्करात सुभेदार होते. ते महूं येथे असताना आंबेडकराचा जन्म झाला. ते सहा वर्षाचे असताना त्याची आई मरण पावली. आंबेडकराचे पालन पोषण वडिल व आत्या यांनी केले. आंबेडकराचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यात झाले व माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मूंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कालेजमध्ये झाले. पदवि घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्युवृत्ती मिळवुन १९१३ मध्ये ऊच्च शिक्षणासाठी अमेरीकेस गेले.

**हे लोकजागृतीचे कार्य चालु असताना स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पुर्ण करण्याकरिता, ते मूख्यत:आपले स्नेही नवल भथेना आणि छत्रपती शाहू यांच्या मदतीने इंग्लडला गेले त्यांनी लंडन विद्यापिठाची डी.एससी, ही दूर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टर झाले. मायदेशी परतताच मुबंईस त्यानी काही काळ प्राध्यपकाचे व प्रार्चायाचे काम केले तथापी अस्पृश्याच्या हिताचे कार्य त्यानी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी'हि संस्था स्थापन केली.'शिकवा, चेतवा, व संघटीत करा ' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते १९२६ साली सातारा जिल्हयातील रहिमतपुरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधुना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला त्यामूळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सूरवात केली. १९२७ मध्ये कूलाबा जिल्हातील महाडच्या चवदार तळयावर अस्पृश्यांना इतराप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यानी आपल्या हजारो अनूयायासह सत्याग्रह केला व अंस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली.

**'अस्पृश्यता हा हिंदुधर्माला लागलेला कलंक आहे भारतीय संस्कृतीचा पाया घालणार्‍या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे. पण तो कलंक घालविण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आजही तो कलंक पुसला गेलेला नाही. तरी या समाजातील अस्मिता जागृत करणारा पहिला महामानव डॉ. आंबेडकर यांनाच मानले पाहिजे. यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार-मेजर या पदावर पोहोचले होते. त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती.

**रामजी लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. महात्मा फुले व माधवराव रानडे यांच्याशी सहचिंतन करणारे होते. मद्य आणि मांस यांपासून अलिप्त होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना सुपारीचेही व्यसन नव्हते. बाबासाहेब जात्याच बुध्दिमान, परिश्रमशील होते. आई-वडिलांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर घडले होते. शिक्षण हेच समाज परिवर्तन घडवून आणणारे अमोघ अस्त्र आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुध्द, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना ते आपले गुरू मानीत.

**बुध्दाचे चरित्र ते रात्रंदिवस लिहित होते, शिकत होते. १९०८ साली ते मॅटि्रकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या प्रागतिक राजेसाहेबांनी शिष्यवृज्ञ्ल्त्;ाी देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. तेथे ते अर्थशास्त्र विषयात एम.ए, पीएच.डी. झाले. बडोदा संस्थानच्या सेवेत काही काळ राहिले. पण समाजातील दलितांच्या जातीयतेचा तिढा सुटलेला नव्हता. शिक्षणाशिवाय हा सुटणार नाही, हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनाने १९२३ साली लंडन गाठले. तेथे लंडन विद्यापीठाचे डी.एस.सी. झाले. त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढल्या. दलितवर्ग शिकू लागला. त्याची अस्मिता जागृत झाली. बाबासाहेबांनी अनेक शोधप्रबंध लिहिले. प्रचंड पुस्तके लिहिली. दलितांच्या हक्कासाठी लढे दिले. सारा समाज ढवळून निघाला.

**१५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदामंत्री झाले. विशाल भालप्रदेश, तेजस्वी डोळे, उंचापुरा सुदृढ बांधा, करारी वृज्ञ्ल्त्;ाी, निग्रही स्वभाव. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. शरीर थकले होते. आजार आणि वृध्दत्व यामुळे ६ डिसेंबर, १९५६ रोजी ते पंचमहाभूतात विलीन झाले. दिल्लीच्या संसद भवनासमोर त्यांचा भव्य पुतळा आजही अस्मितेची संहिता देत उभा आहे.

जीवनपट :
जन्म : १४ एप्रिल १८९१,
जन्मगाव : महू
मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
१९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत(१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री.
शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
मंुबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
१९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
१९३२ पुणे करारावर सही. 
१९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
मृत्यु : ६ डिसेंबर १९५६

महाराष्ट्र् महसूल विभाग


राजकीय प्रशासन विभाग कार्य सुलभ, सोईचे व शीघ्र गतीचे व्हावे ह्याच उद्देशाने प्रशासनाचे प्रादेशिक विभाग पाडले आहेत. महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत. तर मुंबई व ठाणे या महसूल विभागांना एकत्र करून कोकाण हा एकच प्रशासकीय विभाग केल्याने राज्यात सहा प्रशासकीय विभाग आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी महाराष्ट्र्र शासनातर्फे विभागीय आयुक्त नेमला आहे. सध्या महाराष्ट्र्रामध्ये ३५ जिल्हे असून त्यामध्ये ९२ उपविभाग आणि ३५३ तालुक्यांचा समावेश होतो. महाराष्ट्र्रामध्ये महसूल कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासनाचे अनेक भाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये 'गाव' म्हणजे सर्वात लहान घटक मानला जातो. काही गावांचा मिळून एक विभाग मानला जातो त्यास 'सजा' म्हणतात. अशा काही 'सजा' मिळून 'मंडळ' (र्सकल) तयार होते. आणि अनेक मंडलांचा एक तालुका होतो. ४ ते ५ तालुक्यांचा एक उपविभाग (प्रांत) होतो. काही उपविभागांचा मिळून जिल्हा होतो आणि अशा ३५ जिल्ह्यांचे महाराष्ट्र्र राज्य बनले आहे. जसा राज्याचा मुख्य हा राज्यपाल असतो. तसे विभाग प्रमुखाला विभागीयआयुक्त म्हणतात, जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याचप्रमाणे प्रांताचा प्रमुख उपविभागीय अधिकारी तर तालुक्याच्या प्रमुखास 'तहसिलदार' म्हणतात.
महसूल विषयानुसार राज्यातील अधिकार्‍यांची उतरंड पुढीलप्रमाणे सांगता येईल
१) महसूल सचिव,
२) विभागीयआयुक्त
३) जिल्हाधिकारी
४) उपविभागीय अधिकारी,
५) तहसिलदार,
६) मंडल अधिकारी,
७) तलाठी,
८) कोतवाल.

****महाराष्ट्र्रातील प्रशासकीय व महसूल विभाग
१) मुंबई : मुंबई व मुंबई उपनगर
२) कोकण (ठाणे) : ठाणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
३) पुणे : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
४) मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड
५) अमरावती : बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ
६) नागपूर : वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर
७) नाशिक : नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार,अहमदनगर

****घटना कलम ३१२ अनुसार त्यांची नेमणूक केंद्रशासनातर्फे होते. नागरी सेवा (आय.ए.एस.) विभागासाठी राज्याच्या वाटयास ३४७ पदे आहेत. पोलीस विभागासाठी (आय.पी.एस्.) २०३, व वनविभागासाठी (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) १७६ पदे आहेत. अ‍ॅडमिनिस्टे्रटीव्ह इनव्कायरी कमिटीने आपल्या १९४८ च्या रिर्पोटमध्ये, इंडियन स्टॅटयुटरी कमिशन १९३०, रॉयल कमिशन इंडिया १९३०, गोरवाला रिर्पोट १९५१, कमिटी ऑन रिऑर्गनायझेशन ऑफ डिस्ट्रीक्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ पंजाब गव्हर्नमेंट इत्यादी समित्यांनी सदर पदाची तरतूद व समर्थन केले आहे.

*****महाराष्ट्र्रातील महसूल व्यवस्था 
विभागीय आयुक्त विभाग
जिल्हाधिकारी (जिल्हा)
प्रांताधिकारी (प्रांत)
तहसीलदार (तालुका)
तलाठी (गाव, खेडे)
पोलिस पाटील (गाव, खेडे)
कोतवाल

मराठवाडा


***मराठवाडा १ नोव्हेंबर १९५६ पर्यंत हैदराबाद संस्थानात होता. त्यांनतर राज्य पुर्नरचना कायदयाने भाषेच्या आधारावर १९५६ मध्ये मुंबई प्रातांत सामील झाला. मराठवाडयात हिंदु, मुस्लिम, जैन, बौध्द जातीचे लोकं आढळुन येतात.
मराठवाडयाला संताची भूमी म्हणुन ओळखले जाते.

**मराठवाडा हा महाराष्ट्र्राचा गोदावरी खोर्‍यात वसलेला एक भाग असून आठ जिल्ह्याचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. पैठण चे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकिय उत्कर्षाचा काळ होता. पैठणचे धार्मिक महत्त्व पण मोठे होते. अजिंठा-वेरूळची लेणी मराठवाड्याचा मानबिंदू आहे.

****संत समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, संत एकनाथांचे पैठण, शक्तीपिठ माहूर, ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ, औंढा-नागनाथ, घृष्णेश्वर मंदिर, शीखांचा नांदेड येथील गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.

***आज मराठवाड्यातील श्री.यु.म.पठाणयांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. नरहर कुरुंदकर मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्य तर नाथराव नेरळकर यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. फ.मु.शिंदे यांनी काव्य लेखन केले.

***स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामनिजामाच्या हैदराबाद राज्य चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. श्री.स्वामी रामानंदतीर्थ, श्री.गोवींदभाई श्राफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्धवयू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र्र राज्याचा भाग झाला.

****बुद्धवासी श्री.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विभागाबद्दल विशेष ममत्व होते त्यामुळे महाराष्ट्र्र शासनाने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.

****जिल्हे

औरंगाबाद जिल्हा
जालना जिल्हा
परभणी जिल्हा
नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा
बीड जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
हिंगोली जिल्हा

****महत्वाची ठिकाणे
परळी वैजनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
माहुर धार्मिक पर्यटन केंद्र
औंढानागनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
लोणार उल्कापाता मुळे तयार झालेले तळे औरंगाबाद पासुन १५० कि.मी.अंतरावर आहे.


****समाजकारण आणि ग्रामीण विकास

डॉ. ना. य. डोळे
प्रा. मधुकर मुंडे
कॉ. विठ्ठलराव देशपांडे
मच्छींद्र गोजमे
लक्षमण गायकवाड

****अर्थकारण
मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद हे अंतरांच्या दृष्टीने महाराष्ट्र्रातील मध्य्वर्ती शहर आहे. औरंगाबाद जवळील औद्यौगिक क्षेत्र विकसित झाले आहे. मुख्यत्वे कापुस हे मराठवाडा विभागातील प्रमुख पिक असुन. शेतकरींच्या आर्थिक सुरक्षे करीता महाराष्ट्र्र शासन एकाधिकार कापुस खरेदी योजना राबवत होते.

खान्देश


***खान्देश विभाग हा भारताच्या मध्य भागात येतो व महाराष्ट्र्राच्या उत्तरेला हा विभाग पसरलेला आहे. या प्रदेशाला खान्देश हे नाव मोगल साम्राज्यात मिळाले असे इतिसावरून समजते. खान्देश दक्षिण पठाराच्या ईशान्येला आणि तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. त्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा, पुर्वेला विदर्भ, दक्षिणेला देश विभाग आणि पश्चिमेला पश्चिमघाट व गुजरात राज्याच्या सीमा आहेत. खान्देश विभाग विशेषत: तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. तापी नदी बालाघाटच्या डोंगरात उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते ह्या नदीला गिरणा, बोरी, पुर्णा, पांझरा ह्या नदया येऊन मिळतात या नदयांमुळे हा प्रदेश सुपीक झालेला आहे. तसेच ह्या नदयांच्या पाण्यामुळे शेतीला पाणीपुरवठा होतो. खान्देश विभागाची बोली भाषा अहिराणी आहे तसेच येथे भिल्ली, कोकणी ह्या भाषाही बोलल्या जातात.

****खान्देश विभाग १३८८ ते १६०१ पर्यंत फारुखी राज्यकत्र्यांच्या अमलाखाली होता. १६०१ मध्ये मोगल सम्राट अकबराने हा विभाग जिंकून मोगल साम्राज्याला जोडून घेतला. १८ व्या शतकात मराठयांनी मोगलांकडून हा प्रदेश जिंकुन मराठी साम्राज्यात विलीन केला तेव्हापासून तिसरे १८१८ चे मराठा - इंग्रज युध्दापर्यंत मराठा साम्राज्यात खान्देश विभाग होता. १८१८ मध्ये तो इंग्रज साम्राज्यात विलीन झाला. १९०६ मध्ये खान्देशाचे विभाजन होऊन त्याचे दोन विभाग करण्यात आले एक पुर्व खान्देश आणि एक पश्चिम खान्देश. पुर्व खान्देशचे मुख्यालय जळगाव येथे व पश्चिम खान्देशचे मुख्यालय धुळे येथे करण्यात आले.

विदर्भ

**महाराष्ट्र्र राज्यातील एक भौगोलिक प्रदेश. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या नऊ जिल्हयांचा समावेश सांप्रतच्या विदर्भात केला जातो. या भूप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश १९ अंश ५' ते २१ अंश ४७' आणि पूर्व रेखांश ७५ अंश ५९' ते ७९ अंश ११' यांदरम्यान झालेला असून यातील बहुतेक भाग तापी, पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या नद्यांच्या खोर्‍यात मोडतो. विदर्भाच्या उत्तरेस आणि मध्यप्रदेश राज्य, पूर्वेस छत्तीसगड राज्य, पश्चिमेस जळगाव, औरंगाबाद व जालना तसेच दक्षिणेस परभणी व नांदेड हे महाराष्ट्र्रातील जिल्हे आणि आंध्र प्रदेश राज्य आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ ४५.८६८ चौ. किमी.

**प्राचीन ग्रंथांत -विशेषत: ऋग्वेद उपनिषदे, महाभारत, रामायण, पुराणे यांत तसेच नंतरच्या काही पत्रांत याशिवाय तवारीख, प्रवाशांचे वृत्तांत आणि कोरीव लेखांतून विदर्भाचा उल्लेख वर्‍हाड, बेरार, वरदातट, विदर्भ इ. नावांनी करण्यात आलेला दिसतो. पयोष्णी, वरदा, वेणा इ. नद्यांचे व त्यांच्या काठांवरील तीर्थक्षेत्रांचे उल्लेख उपयुक्त साहित्यात येतात. विदर्भनावाच्या राजाने या प्रदेशात आर्याची वसाहत केली, त्यावरुनच या प्रदेशास विदर्भ हे नाव दिले गेले असावे, अशी आख्यायिका आहे. यदुवंशाच्या भोजनामक शाखेचा प्रमुख ऋषभदेव याचा पुत्र विदर्भ असल्याचे भागवतपुराणात म्हटले आहे. त्याला हा प्रदेश मिळाल्याने या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळाले असावे, असे सांगितले जाते.

**भूवर्णन :
उत्तरेस मेळघाट आणि दक्षिणेला बालाघाट यांदरम्यानच्या सुपीक पठारी खोर्‍याचा समावेश विदर्भात होतो. पयानघाट म्हणूनही हा प्रदेश ओळखला जातो. या भागातील सर्वात उंच शिखर बैराट हे अमरावती जिल्हयात चिखलदर्‍याजवळ आहे. सस. पासून या प्रदेशाची सरासरी उंची ५५३ मी. आहे. या भूप्रदेशाचा समावेश दक्षिण ट्रॅपमध्ये होतो. शिलारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी तो बनलेला आहे. येथील भूस्तर प्रामुख्याने ग्रॅनाइट व चुनखडीयुक्त आहे. बरड, रेतीयुक्त , उथळ व चिकण दुमट जमिनी विदर्भातील डोंगराळ प्रदेशात आढळतात. मिश्र खडकापासून त्या तयार झालेल्या असून बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळया जमिनीप्रमाणेच त्यांचे गुणधर्म आढळून येतात.

या प्रदेशात दगडी कोळसा, मॅगॅनीज, लोह, क्रोमाइट, कायनाइट, कुरुविंद, सिलिमनाइट ही खनिजे आढळतात. मॅग्नीज आणि दगडी कोळसा या दोन्ही बाबतींत हा प्रदेश समृध्द असून त्यापासून फार मोठे उत्पन्न मिळते.

**विदर्भातील वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी असून त्यांचा उगम महाराष्ट्र्राबाहेर मध्यप्रदेश राज्यात आहे. वर्धा-पैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात. तापी, पूर्णा, पैनगंगा या अन्य प्रमुख नद्या असून तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर पैनगंगा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पूर्णा ही तापीचीच उपनदी आहे. पैनगंगा ही वर्धा नदीची प्रमुख उपनदी असून पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, कुणी इ. अन्य उपनद्या होत. लोणार हे विदर्भातील एकमेव नैसर्गिक सरोवर असून त्यातील पाणी खारे आहे. भंडारा जिल्हयात सु. १५,००० तलाव आहेत, म्हणून यास महाराष्ट्र्रातील तलावांचा जिल्हा' म्हणतात.

**मेळघाट पर्वतउतारावर घनदाट जंगले असून त्यांतून उत्तम प्रकारचे सागवान, ऐन, धावडा, हळदू, शिसव, इ. इमारती व फर्न्ािचरचे लाकूड मिळते. येथील जंगलांत वाघ, चिज्ञ्ल्त्;ाा, हरिण, अस्वल, गवा, नीलगाय, काळवीट, इ. प्राणी आढळतात. विदर्भात पूर्वी गावराणी किंवा बेरारी या नावांनी घोडयांची पैदास होत असे. त्यांतील उमरडा व खामगावी या जाती काटक व दमदार म्हणून प्रसिध्द होत्या. पुढे दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध झाल्यानंतर त्यांची पैदास जवळजवळ संपुष्टात आली आणि संकराचेही प्रयत्न झाले नाहीत.

**कापूस, गहू, ज्वारी, तूर, भात ही विदर्भातील प्रमुख पिके आहेत. यांशिवाय संत्री, आंबे व विडयाची पाने यांच्या बागा आणि मळे आहेत. लोकाचा मुख्य धंदा शेती असून त्याखालोखाल कापड विणण्याचा धंदा चालतो. सरकी काढण्याचे, कापूस दाबणी व वटण यांचे कारखाने असून काही ठिकाणी तेल काढण्याच्या गिरण्या आहेत. तेंदू पानांपासून विडया वळण्याचा धंदा या प्रदेशात मोठया प्रमाणात चालतो. विदर्भात वरील धंद्यांव्यतिरिक्त हातमाग, घोंगडया बनविणे, चामडी कमाविणे, लाकूड कापणी वगैरे अन्य धंदे मोठया प्रमाणात चालतात. या प्रदेशात गोंड, कोरकू, बंजारा, इ. आदिवासींची लोकसंख्या डोंगराळ भागात लक्षणीय आहे.

**इतिहास :
विदर्भाच्या भौगोलिक सीमांमध्ये निरनिराळया कालखंडांमध्ये बद्दल होत गेले आहेत. प्राचीन ग्रथांत उल्लेख केलेल्या विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होय. प्राचीन काळी विदर्भात उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेस कृष्ण नदीच्या खोर्‍यापर्यंत आणि पश्चिमेस ऋषिक देशापासून पूर्वेस कोसल देशापर्यंत पसरलेल्या विशाल भूभागाचा समावेश होत असे. नर्मदेच्या उत्तरेकडील भोपाळ व भिलसा राज्यांचा समावेशही विदर्भात होत असे. सम्राट अशोकाच्या धर्म-महामात्र या पदाधिकार्‍याचा चंद्रपूर जिल्हयातील देवटेक येथील शिलालेख, या भागावर मौर्याचे इ.स. पू. तिसर्‍या शतकात आधिपत्य असल्याचे दर्शवितो. शुंग काळात अग्निमित्र शुंग याने विदर्भ पादाक्रांत करुन माधवसेन राजाची बहीण मालविका हिच्याशी विवाह केला. या विषयावर पुढे कालिदासाने मालविकाग्निमित्र हे नाटक लिहिले. त्यानंतर सातवाहनांच्या आधिपत्याखाली विदर्भ होता. त्यांची नाणी अकोला जिल्हयातील तर्‍हाळा येथे मिळाली. सातवाहनानंतर वाकाटक वंशाचा या प्रदेशातच उदय झाला. त्या वंशातील राजांनी या प्रदेशावर सु. २५५ वर्षे राज्य केले. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे नंदिवर्धन आणि प्रवरपूर व पवनार येथे होत्या. या वंशातील दुसरा रुद्रसेन यांस चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती ही दिली होती. वाकाटकांच्या वेळी विदर्भात संस्कृत वा प्राकृत वाड्.मय कलाकौशल्य, व्यापार यांचा विकास झाला. दुसर्‍या प्रवरसेनाने प्रवरपूरला रामचंद्राचंे भव्य मंदिर बांधले, गडचिरोली जिल्हयातील मर्कंडी येथील मंदिराचे बांधकाम त्या काळात झाले. परमार नृपती भोजाचा पुतण्या जग्गदेव हा चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्य याच्या आश्रयास गेला असता त्यास त्याने विदर्भाच्या एका भागाचा अधिपती नेमले. त्याचा इ. स. १११२ चा कोरीव लेख यवतमाळ जिल्हयातील डोंगरगाव येथे मिळाला आहे. त्यांनतर विदर्भावर यादवांची सज्ञ्ल्त्;ाा आली. त्यांचे अनेक लेख या भागात सापडतात. पुढे पेशवाईच्या अस्तानंतर नागपूर संस्थानांत ईस्ट-इंडिया कंपनीचा रेसिडेंट राहू लागला आणि संस्थानात गादीसाठी अंतर्गत स्पर्धा उद्भवली. तेव्हा १८५४ मध्ये इंग्रजांनी दत्ताक वारस नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. तत्पूर्वी १८५३ पासून ब्रिटिशांनी निजामास काही वार्षिक खंडणी देण्याचे कबूल करुन येथील राज्यकारभार आपल्या अखत्यारीत घेतला. ब्रिटिशकाळात वणी किंवा ऊन या जिल्हयाची स्थापना करण्यात आली. पुढे १९०५ मध्ये त्याचे यवतमाळ हे नामांतरण झाले. १९५६ च्या राज्यपुर्नरचनेनंतर विदर्भातील सर्व जिल्हे महाराष्ट्र्र राज्यात अंतर्भूत करण्यात आले. विदर्भाच्य विकासासाठी १९७३ मध्ये 'नागपूर करार' करण्यात आला, मात्र त्यांचे पालन झाले नाही. त्यांनतर विदर्भाच्या विकासातील असमतोल जाणून घेण्यासाठी अर्थतज्ञम्प्;ा वि.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट १९८३ मध्ये एक समिती कार्यरत झाली. तिने एप्रिल १९८४ मध्ये आपला अहवाल दिला. याच सुमारास प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याच्या कल्पनेस चालना मिळाली. विदर्भासाठी वैधानिक विकास मंडळ १९९४ मध्ये अस्तित्वात आले आहे. तथापि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागाणीची चळवळ अद्याप थंडावलेली नाही.

**प्रेक्षणीय स्थळे :
विदर्भात चिखलदरा, भामरागड व सोमनूर ही थंड हवेची ठिकाणे असून ताडोबा तलावाजवळ ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य व मेळघाट जंगलाचे क्षेत्र संरक्षित केले आहे. या जंगलात ढाकणे-कोळखाज व खेमाडोर येथे विश्रामधामे बांधलेली आहेत. पुसद, रामटेक, लोणार, मेहेकर, वाशी व वार्शी टाकळी येथे यादवकालीन हेमाडपंती मंदिरे असून मर्कडादेव येथील राष्ट्रकूटकालीन मंदिरे त्यांवरील शिल्पांसाठी ख्यातनाम आहेत. या भागातील गाविलगड, नरनाळा हे किल्ले प्रसिध्द आहेत.