***भारतास पूर्व आणि पश्चिम किनारा मिळून एकंदर ६,१०० किमी. लांबीची किनारपट्टी लाभली असली, तरी हा किनारा दंतुर नसल्याने आणि गाळाने भरण्याची शक्यता जास्त असल्याने त्यावर बंदरे जास्त नाहीत. शिवाय पूर्व किनार्यावर ईशान्य मॉन्सून व पश्चिम किनार्यावर नैऋत्ये मॉन्सून वार्यांपासून होणार्या वादळांचा त्रास बराच होतो. तरी देखील लहान मोठी मिळून एकूण १७६ बंदरे आहेत. चार हजार टनांपेक्षा मोठी सागरी जहाजे सुरक्षित उभी राहू शक्तील असे धक्के असलेली व प्रतिवर्षी दहा लाख टनांपेक्षा जास्त व्यापारी मालाची उलाढाल करणारी बंदरे ही मोठी बंदरे म्हणून ओळखली जातात.
**भारतात पश्चिम किनार्यावर कांडला, मुंबई, मार्मागोवा, मंगलोर व कोचीन आणि पूर्व किनार्यावर तुतिकोरिन, मद्रास, विशाखापटनम, पारा दीप, कालिकत व हल्डिया अशी एकूण ११ मोठी बंदरे आहेत. इतर बंदरांचे मध्यम व लहान असे प्रकार केलेले असून त्यांची एकूण संख्या १६५ आहे.
1)कालिकत
हुगळी नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेले कालिकत बंदर नदीच्या मुखापासून १३३ किमी आत आहे, पश्चिम बंगाल, आसाम ,बिहार, ओरिसा, उत्तरे प्रदेश मध्य प्रदेश, नेपाळ व भूतान यांचा बाहेरच्या जगाशी व्यापार या बंदरातून होतो. नदीतील वळणांमुळे रेतीचे बांध नदीत नैसर्गिक रीतीने होणे कायम चालू असते, त्यामुळे नदीचे सर्वेक्षण करणे व गाळबोटीने गाळ काढून टाकणे ही कामे कायम चालू असतात. बंदराधिकारी सर्वेक्षण करुन नदीत पाण्याची खोली किती असेल हयाची माहिती सहा आठवडे आधी जहाज कंपन्यांना पुरवितात. नदीस वळणे असल्याने साधारणत : १५२ मी. पेक्षा जास्त लांबीचे जहाज बंदरात येऊ शकत नाही. तसेच प्रत्येक जहाजावर मार्गदर्शक असल्याशिवाय जहाज बंदात येऊ शकत नाही, तसेच प्रत्येक जहाजावर कलकत्यास मुसळी लाट येत असलयाने धक्क्याशी ५.५ ते ६ मी. पाण्याचा डुबाव लागणारी जहाजेच बांधतात.
2)हल्दिया
हुगळी नदीच्या बदलत्या पात्रामुळे व गाळाने भरुन जाण्याच्या प्रवृत्तीमुळे कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरास जोडबंदर असण्याची आवश्यकता सु. १०० वर्षापूर्वीच जाणवली होती. त्या दृष्टीने डायमंड हार्बर, लफ पॉइंट, गेओनखाली, सौगोर बेअ इ. सर्व जागांचा विचार करण्यात आला. पण १२ ते २१ मी. गाळ काढणे ही एक खर्चिक बाब होती फराक्का धरणामुळे कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरात पुरेसे खोल पाणी मिळणार असले तरी मोठया जहाजांची वाढती वहातूक व कलकज्ञ्ल्त्;ाा बंदरातील गाळ साठण्याची प्रवृतती लक्षात घेऊन एका जोडबंदराची आवश्यकता त्याच्या दक्षिणेकडील ६५ किमी. अंतरावरील हल्दियाने पूर्ण झाली आहे. हुगळीतील भरती ओहोटीच्या स्थितीनुसार तयार केलेल्या व ३ सरकते कुसुलांचे दरवाजे असलेल्या जगातील अशा तर्हेच्या सर्वात मोठया जलपाशाने साठविलेल्या पाण्याचे हल्डिया हे बंदर आहे.
3)पारादीप
कालिकत व विशाखापटनम या बंदरांच्या मध्ये वसलेले, खोल पाण्याची सोय असलेले हे उत्कृष्ट बंदर आहे. ओरिसातील लोह धातुक क्रोम ,ग्रॅफाईट , मॅंगॅनीज, दगडी कोळसा वगैरे खनिजांच निर्यातीसाठी मुख्यता: या बंदराचा विकास करण्यात आला. अशुध्द क्रोम निर्यात करणारे भारतातील हे एकमेव बंदर आहे. १९६५ मध्ये मोठे बंदर म्हणून घोषित झाल्यावर याचा विकास झपाटयाने झाला.
4)विशाखापटनम
भारताच्या पूर्व किनार्यावरील मद्रास व कालिकत या दोन बंदराच्या मध्ये, आंध्र प्रदेशातील मेघाद्री गेड्डा नदीच्या मुखावर वसलेले हे एक महत्वाचे बंदर आहे. या बंदराच्या बांधकामास १९२२ साली सुरुवात होऊन १९३३ साली त्याचा प्रत्यक्षात वापर सुरु झाला आणि १९६४ साली ते मोठे बंदर म्हणून घोषित झाले.
नदीमुखाच्या दोन्ही अंगांस टेकडया असल्यामुळे बंदराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले आहे. बंदरास १.६२ किमी. लांबीचे सु. ९५ मी. रुंदीचे व सु. ११ मी. खोलीचे प्रवेश पात्र असून प्रवेशद्वारापाशीच जहाजे वळविण्यासाठी ३६६ मी. व्यासाचे क्षेत्र उपलब्ध आहे.
5)तुतिकोरिन
पूर्व किनार्यावरील वार्यावादळापासून संपूर्ण सुरक्षित व उधाणाच्या भरतीचा उपद्रव जवळजवळ होत नसलेले हे बंदर दक्षिण भारताच्या व्यापारी गरजांसाठी विकसित करण्यात आले आहे. प्राचीन काळापासून बंदर म्हणून उपयोग होत असला, तरी १८१५ साली पहिला धक्का बांधण्यात येऊन मध्यम प्रतीचे बंदर म्हणून याचा उपयोग होऊ लागला. बंदराचा विकास करण्याचे प्रत्यक्ष काम १९६० साली सुरु झाले. आणि १९६८ मध्ये त्याला जोराची चालना मिळाली. वाहतुकीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन जुन्या लहान बंदराला लागून मोठया बंदाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार तुतिकोरिन हे उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूंस दगडी ढिगार्याचे बांध घालून बांधलेले कृत्रिम बंदर होणार आहे. बंदराचे १२२ मी. रुंदीचे प्रवेशद्वार पूर्व धक्क्यात असून बंदराचे जलाशय क्षेत्र ३८४ हेक्टर आहे. उत्तरेकडील बांध हा जगातील अशा तर्हेचा सर्वात मोठा बांध आहे.
6)कोचीन
आपल्या महापुरामुळे केरळची 'अश्रुनदी ' म्हणुन समजल्या जाणार्या पेरियर नदीने १३४१ साली आपले पात्र वळवून सध्याच्या एर्नाकुलम शहराच्या समोरच नदीचे नवे मुख आणले आणि या बंदराची उभारणी शक्य झाली. सोळाव्या शतकापासून पोर्तूगीज, डच व नंतर ब्रिटिश असे या बंदराच्या मूख्य अभियंत्यांनी विलिंग्डन बेअ व समुद्र यांतील खडकांचा अडथळा ५.६ किमी. लांबीच्या, १३५ मी. रुंदीच्या व ९ मी. खोलीच्या कालव्याने दूरकेला व बंदराचा भर समुद्राशी संबंध प्रस्थापित झाला. नंतर बेट व मुख्य भूमी जोडणारे पूल, रस्ते व रेल्वे झाले.
बंदरात १२ धक्के व ४ क्वे असून कोळसा व तेल यांसाठी प्रत्येकी एकएक स्वतंत्र धक्का उत्तरेस व दिक्षणेस आहेत. उतारुंसाठी मध्येपाद आहे. पश्चिमेकडील मूट्टॅनचेरी पात्रात १३ व एर्नाकुलम पात्रात ३ जहाजे उभी राहू शक्तील अशी नौबधांची सोय आहे. बंदरातील तेल धक्क्याशी ८५,००० टन भाराची व १२ मी. डुबावाची तेलवाहू जहाजे उभी राहू शकतात.
7)मुंबई
भारताच्या पश्चिम किनार्यावरील व माहाराष्ट्र राज्याची राजधानी असलेले हे बंदर एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते. मुंबई हे एक बेट असून मुख्य भूमीशी रेल्वे व हमरस्ते यांनी ते जोडले गेलेले आहे. बेटाच्या पूर्व बाजूस बंदर वसलेले आहे. कुलाब्याच्या नैसर्गिक लाटारोधक बांधामुळे १,८४० हेक्टर क्षेत्राचे शांत बंदर तयार झाले आहे. ओहोटीच्या वेळीसुध्दा बंदरात ९ मी. खोल पाणी मिळू शकते. या भागात तुर्भे, बुचर व एलेफंटा ही बेटे मुख्य बेटाच्या पूर्वेस ठाण्याच्या खाडीत आहेत. सुएझ कालव्यामुळे जलवाहतुकीत एकदम क्रांती झाली आणि मुंबई बंदरास महत्व प्राप्त झाले. कुलाब्याच्या ससून गोदीपासून १८७५ मध्ये मुंबई बंदराची सुरुवात झाली. त्यांनंतर १८८० साली प्रिन्सेस गोदी, १८८८ साली व्हिक्टोरिया गोदी व १९१४ साली अलेक्झांड्रा गोदी बांधून पुरी करण्यात आली. हयांशिवाय बॅलराड पिअर, तुर्भे बेटावर पीरपाव, बुचर बेट, भाऊचा धक्का इ.
8)कांडला
पश्चिम किनार्यावर गुजरातच्या कच्छ भागातील कांडला खाडीच्या पश्चिम किनार्यावर भर समुद्रापासून सु. २९० किमी. आत वसलेले हे अगदी पश्चिम व उत्तरेकडील मोठे व संरक्षित बंदर आहे. संस्थानी स्पर्धेतून १९३० साली पहिली कॉक्रीटची जेटी बांधून कच्छच्या महाराजांनी या बंदराची सुरुवात केली. १९४७ साली झालेल्या हिंदूस्थानच्या फाळणीनंतर मुंबईच्याउत्तरेस मोठे बंदर न राहिल्याने या बंदराचा विकास करण्याचे ठरुन १९५३ साली कामास सुरुवात होऊन १९५७ मध्ये बंदर वाहतूकीस खुले झाले.
कांडला बंदर खाडीवर खूप आत असल्याने व पाणी खोल असल्याने लहरी निसर्गाचा तेथे उपसर्ग पोहचत नाही. एका वेळी ५ जहाजे लागू शक्तील एवढा मोठा १,१६५ मी. लांबीचा व ९.६ मी. खोलीचा धक्का आहे. बंदरात ६ जहाजे नागंरता येतील अशा लांबीचे छोटे धक्केही बांधण्यात आले आहेत. यांपैकी एक मिठासाठी, एक स्फोटक पदार्थासाठी, एक जहाज नांगरुन ठेवण्यासाठी व इतर ३ मालासाठी असून तेथे ७ ते १२ मी. खोल पाणी असते तेल व द्रवरुप रसानयांसाठी एकूण ३४१ मी. लांबीचे दोन धक्के आहेत. नदी बंदर विभागात लहान गलबतांसाठी व अवजड माल हाताळण्यासाठी ३ धक्के बांधण्यात आले आहेत. मच्छीमारीसाठी शीतगृहाची सोय असलेला एक स्वतंत्र धक्का आहे. खाडीतील गाळ काढून एक तरता धक्का व तरती निर्जल गोदी असून ७३ मी. लांब व ३.४ मी. डुबावाची जहाजे येथे दुरुस्त करता येतात. खाडीतील गाळ काढून पाण्याची पूरेशी खोली ठेवण्यासाठी २,५०० टन भाराच्या गाळबोटी आहेत. बंदरात संक्रमण कोठारे व माल साठविण्याची गुदामे आणि माल चढविण्याच्या उतरविण्याच्या यांत्रिक सोयी आहेत.