*भारतीय लष्करातील पहिली जवान होण्याचा बहुमान कोणत्या महिलेने मिळवला आहे ?- शांती तिग्गा
* गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?- डॉ. व्ही. एस. आईचवार
* राज्यातील महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनेसाठी उच्च व तांत्रिक विभागाने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? - डॉ. अरुण निगवेकर
* मिफ्ता पुरस्कार सोहळा - 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली?- तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ).
* महाराष्ट्रात 2010 ते 2015 या कालावधीत जलस्वराज्य प्रकल्प कोणत्या बँकेच्या मदतीने राबवला जाणार आहे? - जागतिक बँक
* 2010 चा 46 वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर करण्यात आला ? - नाटककार चंद्रशेखर कंवार
* राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?- ममता शर्मा (राजस्थान)
* सन 2012 मध्ये फिफाचे सध्या अस्तित्वात असलेले आशियातील कोलंबो येथील मुख्यालय कोठे स्थलांतर करणार आहे ?- भारत
* कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना भारतीय लष्करामधील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली ?- महेंद्रसिंग धोनी व अभिनव बिंद्रा
* भारतातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्व देशभर राबवण्यात येणारी एकमेव योजना कोणती आहे ?- राजीव आवास योजना
* 2011 चा मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा कालिदास सन्मान पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?- अनुपम खेर
* ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? - प्रभाकर पेंढारकर
* भारतातील संपूर्ण बँकिंग स्टेट म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे ?- केरळ
* भारतातील पहिले संरक्षण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?- हरियाणा (बिनोला)
* महाराष्ट्रातील कोणत्या शहराची आदर्श सौर शहर म्हणून निवड करण्यात आली आहे ?- नागपूर
* महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस हा माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे ?- 28 सप्टेंबर
* पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे कोठे आयोजित करण्यात आले आहे?- नाशिक
* सन 2011 मध्ये फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले होते?- नोयडा, उत्तर प्रदेश
* भारतातील पहिली डबल डेकर वातानुकूलित रेल्वेगाडी या दोन स्थानकांदरम्यान सुरू झाली आहे ?- हावडा-धनबाद
* वेस्ट इंडीजविरुद्ध कोणत्या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकावून विक्रम प्रस्थापित केला आहे?-वीरेंद्र सेहवाग
* मराठी नाट्यसृष्टीत विष्णुदास भावे पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?- रत्नाकर मतकरी
* 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ? - श्रीकांत मोघे
* भारतातील बहुनामांकित टाटा ग्रुप कंपनीच्या नव्या चेअरमनपदी कोणाची निवड करण्यात आली ?- सायरस मिस्त्री
* महाराष्ट्र सरकारने कोणत्या दोन जिल्ह्यांत महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ?- चंद्रपूर व लातूर