माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा


माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

**असा अत्यंत पराकोटीचा अभिमानकळवळा असणारे आणि मराठी भाषेला पुन्हा गतवैभव प्राप्तकरुन देण्यासाठी आयुष्यभर झगडणारे कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवसहाच दिवसमराठी राजभाषा दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या बहुतेकभाषणांतलेखांमध्ये मराठी हा विषय समान असेमराठीवर सर्वच बाजूने होणारे आक्रमण मराठीचीशोचनीय परिस्थिती यावर ते वेळोवेळी भाष्य करीतजागतिक मराठी परिषदेमार्फत त्यांनीसमाजात याविषयीची जाण निर्माण केली.
**स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाहीअनेकांनीत्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केलेपण वाढदिवसाच्या आधी दोन दिवस ते अज्ञातवासातनिघून जातपरंतु त्यांच्या पंचाऐंशीव्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेटदिलीचकुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणेतारेतारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एकाताऱ्यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिलेस्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन  गेट ऑफ हेवन्सम्हणून ओळखल्या जाणाऱ्याताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आलेएवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचाजन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला.
**पारतंत्र्याच्या काळात सर्वच भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होणे साहजिक होतेपरंतु स्वातंत्र्योत्तरकाळात विशेषतभाषाधारित राज्यरचना झाल्यानंतर महाराष्ट्रातच सर्वत्र मराठीला मान खालीघालून चालावे लागते ही परिस्थिती अत्यंत शोचनिय आहे असे कुसुमाग्रजांना वाटेप्राचीन काळातधर्मभाषा होण्यासाठी मराठीला लढावे लागलेआज राज्यभाषा होण्यासाठी तिला पुन्हा लढावे लागलेही खंत त्यांना होती१९८९ च्या जागतिक मराठी परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की,डोक्यावरसोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात उभी आहे.कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झाली असली तरी तिला अधिक धोका आहे तो लोकभाषाम्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचामुंबई हे सर्वाश्रयी शहर आहेइथे अनेक प्रांतातील लोकयेतातरहातात याचा आम्हाला अभिमान आहेपरंतु धनसत्तेच्या बळावर तिला कोणी आपलीबटीक करण्याचा प्रयत्न करु नयेमंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी वा मुख्यमंत्र्यांशी आपण मराठीत बोलूशकतो पण इतरत्र हॉटेलमध्येदुकानात आपल्याला हिंदी किंवा इंग्रजीतच बोलावे लागतेकलकत्ता,मद्रास ही शहरेही सर्वाश्रयी आहेतपण तेथील बहुतांश व्यवहार स्थानिक भाषेत चालतातपरिस्थितीबदलायची असेल तर सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात मराठीचा प्रवेश होणे गरजेचे आहे.
**मराठीसाठी लढणा-या कुसुमाग्रजांनी इंग्रजीचा कधीही द्वेष केला नाही उलट त्यांचे इंग्रजीवरमनापासून प्रेम होतेकेवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजेइंग्रजीने आपल्याला उघडून दिली आहेत हे इंग्रजीचे ऋण ते मानतभूतकाळात रुतलेल्या यासमाजाला आधुनिकतेपर्यंत नेण्याचे कार्य इंग्रजीने केले असेही ते म्हणतअसे असले तरी शिक्षणक्षेत्रात इंग्रजीची लुडबूड मात्र त्यांना मान्य नसे.
**कवितानाटककथाकादंबरीललित निबंध असे बहुविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळूनत्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजविलेगर्जा जयजयकार क्रांतिचागर्जा जयजयकारअन्वज्रांचे छातीवरतीघ्या झेलून प्रहार ही कविता म्हणजे प्रत्येक देशबांधवाचे मनोगत आहे.त्यांच्याप्रतिभेने कवितेप्रमाणेच नाटकही समृद्ध केलेनटसम्राटने तर सारे उच्चांकच मोडले होतेसाहित्यसेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होतेनाशिकचे सार्वजनिक वाचनालय,लोकहितवादी मंडळ यांच्या जडणघडणीत ते सक्रीय होतेसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही तेसहभागी होतेआयुष्याच्या उत्तरार्धात आदिवासींसाठीमुलांच्या शिक्षणासाठी कुसुमाग्रजप्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्नशील होतेअसा मराठीच्या क्षितिजावरील झळाळता तारा दिनांक १०मार्च १९९९ रोजी कायमचा अस्तंगत झाला.
**त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या विकास तसेच संवर्धनासाठी महाराष्ट्रशासनाने भरीव प्रयत्न केले आहेतनाशिक येथील कुसुमाग्रज बहुउद्देशीय स्मारकाला पन्नासलाखांची मदत यापुर्वीच केली आहेमराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने वेगळ्या विभागाचीस्थापना केली आहेत्याअंतर्गत साहित्य-संस्कृती मंडळामार्फत व्युत्पत्तीकोशखाद्यकोशअलंकारआणि भूषणांविषयक कोशराज्यातील विविध नद्या तसेच सह्याद्री पर्वतविषयक कोशराज्यातीलविविध बोली भाषांविषयक कोश यांची निर्मिती केली जाणार आहेग्रंथोत्सव तसेच साहित्योत्सवाच्यामाध्यमातून राज्यात तसेच राज्याबाहेरील मराठी भाषिक भागांमध्ये मराठी भाषेचा विकाससाधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेतविश्वकोश फक्त कोषातच  राहता तो सर्वसामान्यजनताविद्यार्थी आदी सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येणार आहेत