महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषयी माहिती:मार्गदशन
एमी.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीबद्दल आणि त्या परीक्षेत कसं यश मिळवलं पाहिजे, एम.पी.एस.सी.चा अभ्यास कसा केला पाहिजे, या मुद्द्यांना अनुसरून सर्वसमावेशक अशी चर्चा करण्यात आली.
या चर्चेत स्टडी सर्कलचे आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन केलं.
एम.पी.एस.सीचं वेड शहरी भागापेक्षा ग्रामीण महाराष्ट्रात जास्त आहे. इंटरव्ह्यू तर अगदी येऊन ठेपले आहेत. शेवटच्या क्षणी तुम्ही काही टीप्स द्याला का ?
आनंद पाटील : पूर्वी एम.पी.एस.ची परीक्षा ही 100 मार्कांची होती. यंदा पहिल्यांदाच ती 200 मार्कांची आहे. 1600 मार्कांची परीक्षा यापूर्वी झालेली आहे. आता या 1800 गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जर 1 हजार 500 किंवा 1100 गुण मिळवले तर मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो. पूर्व परीक्षांचा निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1600 पैकी 847 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांनी चिंता करण्याचं कारण आहे. एमपीएससीत ओेबीसीसाठी जो स्पोटर्स कोटा आहे त्यातलं उत्तीर्ण होण्याचं प्रमाणं महाविद्यालयांसारखं 40 टक्क्यांचं आहे. ज्यांना 442 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांना मुलाखतीत बोलावलं जाणार आहे. मुलाखतीची चांगली तयारी केली 200 पैकी 150 पर्यंत गुण एखाद्या विद्यार्थ्याला सहज मिळू शकतात.
स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे ?
आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांमधून निवडला जाणारा उमेदवार हा एखाद्या विभागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, एखाद्या विशिष्ट खात्याचा प्रमुख असतो. त्याच्याकडची निर्णय क्षमता, परिस्थितीला आकलन करून घेण्याची क्षमता, समस्यांवर तोडगा काढण्याची कुवत उमेदवारात असायला हवी. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे ती क्षमता असायला हवी. आणि याचीच चाचपणी ही मुलाखती दरम्यान केली जाते. यासाठी मुलाखती दरम्यान उमेदवाराला एखादा प्रश्न विचारला असता त्यानं तो नीट ऐकला पाहिजे. प्रश्न विचारण्याला काय उत्तर अपेक्षित आहे, याचा अंदाज विद्यार्थ्याला असायला हवा. दिली गेलेली उत्तरं ही मुद्देसूद, परिणमकारक आणि जास्त वेळ घेणारी असता कामा नये. ती क्वीक आणि सेन्सिबल असायला हवी. मुलाखत ही 15 ते 20 मिनिटांची असते. तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या खिडकीत तुम्ही 200 गुणांसाठी कसा चांगला निर्णय घेता हे दाखवायचं असतं. संख्यात्मक उत्तरं देण्यापेक्षा आपली उत्तरं ही गुणात्मक किती दर्जेदार असतील याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असायला हवा. ब-याचवेळा आपण टिपिकल साचेबद्ध इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. उमेदवाराकडची ओरिज्नॅलिटी जशीच्या तशी मुलाखत देताना बाहेर आली पाहिजे.
मुलं मुलाखतीचं प्रचंड टेन्शन घ;ेतात. तर हे टेन्शन येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे ?
आनंद पाटील : टेन्शन घ्यायचं नसेल तर उमेदवाराकडे आत्मविश्वास असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. हा प्रश्न विचारला तर ब-याच मुलांना भीती वाटते. मी जर बाजूनं बोललो तरी मला गुण पडणार नाही. बाजूनं नाही बोललो तरी मला गुण मिळणार नाहीत, ही भीती विद्यार्थ्यांना वाटत असते. तर ही भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे भूमिकेची निश्चितता असायला हवी.
यु.पी.एस.सी. , एम.पी.एस.सी परीक्षांचे फॉर्म कधी निघतात ?
आनंद पाटील : निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघतात. त्या जाहिरातींवर लक्ष ठेवलं पाहिजे. या एका आठवड्यामध्ये विक्रीकर निरीक्षकाच्या पदांसाठीच्या परीक्षेचे फॉर्म निघतील. तर या परीक्षांच्या जाहिरात प्रसिद्धीनंतर साधारण महिन्याभराचा वेळ दिला जातो. हा वेळ परीक्षेच्या तयारीसाठी असतो. यु.पी.एस.सीच्या वर्षाला साधारण 16 परीक्षा होतात. एम.पी.एस.सीच्याही साधारण तेवढ्याच परीक्षा होतात.
सद्यस्थितीत आपल्याला दोन प्रकारचे ट्रेन्डस् पहायला मिळत आहे. एकीकडे डॉक्टर , इंजिनिअर होण्यासाठी धडपडणा-या मुलांचा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या विद्यार्थ्यांचा एक वर्ग पहायला मिळतो. तर या स्पर्धा परीक्षांसाठी बसणा-या मुलाचं प्रमाण तरी काय आहे ? दरवर्षी लाखांच्या संख्येनं विद्यार्थी परीक्षेला बसतात का ?
आनंद पाटील : महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे त्यात साधारणपणे दीड हजारांपेक्षा जागा स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून भरल्या जातात. या स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं किमान वय हे 19 आणि ओबीसी आणि इतर जातीेंसाठी 39 वर्षं आहे. तसं आयोगानं ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार साधारणपणे तीन कोटी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. यातले पदवीधर विद्यार्थी हे 40 टक्के असतात. तर साधारण 40 लाख विद्यार्थी या परीक्षांना पात्र ठरणारे असतात. स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्यक्ष तयारी करणारे विद्यार्थी 4 लाख असतात. प्रत्यक्ष बसणारे 2 ते अडीच लाख असतात. दोन - अडीच लाखांतून दीड हजार विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षांसाठी केली जाते.
सैन्यदलात काम करणा-या माजी सैनिकांना जर एम.पी.एस.सी.ची परीक्षा द्यायची असेल तर काही स्पेशल तरतूद आहे का ? आनंद पाटील : माजी सैनिकांसाठी गेल्यावर्षीपर्यंत मंत्रालयातल्या पी.एस.आय., एस.पी.आय. या मंत्रालयातल्या जागांसाठी परीक्षा होत्या. या परीक्षांच्या वयोमार्यादेत सूट होती. त्यामुळे असे विद्यार्थी वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायचे. पण आता अशा स्वरूपातल्या परीक्षा देणं बंद केलं आहे. सैन्यदलासाठीचा स्पेशल कोटा बंद केला आहे. पण आता 38 वर्षं वयाचा डिफेन्समध्ये नोकरी करणारा उमेदवार ओबीसी किंवा इतर कोणत्याही अनुसुचित जाती जमातींपैकी असेल तर तर तो देऊ शकतो. डिफेन्समध्येअसणारा 33 वय वर्षं असणारा ओपन कॅटेगीरीतला विद्यार्थी मंत्रालयातल्या क्लास थ्रीच्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो. इन सर्व्हिसमध्ये असताना परीक्षा देता येतात. पण डिफेन्ससाठीचा स्पेशल कोटा पदांचं अपग्रेडेशन केल्यापासून रद्द केला आहे.
विज्ञान शाखेतून शिक्षण शिकत असलेल्या एम.पी.एस.सी.च्या परीक्षांसाठी काय स्कोप आहे ?
आनंद पाटील : चांगला स्कोप आहे. 19 किंवा 20 व्या वर्षी जर विद्यार्थ्यांनी एमपीएसची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झालात डेप्युटी कलेक्टर होता येतं. आणि चाळीसाव्या वर्षी परीक्षा न देता आय.एस होता येतं. इथे तुम्हाला वरची जागा मिळते.
साधारणपणे या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी किती आधीपासून तयारी करावी ? सामाजिक प्रश्नांची जाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत ?
आनंद पाटील : स्पर्धापरीक्षांसाठी आवश्यक असणारं ज्ञान साधारणपणे आपल्याला कोणत्याही शाखेतून मिळतं. स्पर्धा परीक्षांचा बेसिक अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची मूलभूत आकलन क्षमता जाणून घेण्यासाठीचा असतो. त्यामुळे आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थ्यानं काय वाचलंय, कसं वाचलंय, ते लक्षात कसं ठेवलंय, समजून घेऊन केलंय की नाही यावर अवलंबून असतं.आणि हेच स्पर्धा परीक्षांच्या बेसिक तयारीत तपासून पाहिलं जातं. समजा कोणत्याही विद्यार्थ्याला 20 व्या किंवा 21 व्या वर्षापर्यंत परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी साधारणपणे 12 व्या किंवा 13 व्या वर्षाप 66;सून करायला हवी. लहानातली लहान प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
एपीएससीची परीक्षा देताना परीक्षेचं माध्यम काय असावं ?
आनंद पाटील : स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना साधारणपणे लेखी आणि मुलाखत देताना परीक्षेचं माध्यम साधारणपणे सारखंच असावं. लेखी परीक्षेला वेगळं माध्यम आणि मुलाखतीला वेगळं माध्यम असं असू नये. इंग्रजीतून बोलता येत नसेल तर दुभाषिकाचा उपयोग करावा. मराठी भाषेचा वापर करून स्पर्धा परीक्षा देता येते. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी. ते स्पर्धा परीक्षेत भारतातून दुसरे आले होते. त्यांनी मराठी भाषेतूनच स्पर्धा परीक्षा दिली होती.
इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ? आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ? आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.
डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?
आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.
ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?
आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्यासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.
कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?
आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्ना या दोन्ही परीक्षा देता येतात.
हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला
?
आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.
अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?
आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणविभागणी
पूर्वपरीक्षेच्या गुणांकाची विभागणी
एकूण गुण :200
कला/समाजशाखा : 30
बौध्दिक चाचणी : 50
चालू घडामोडी : 30
शास्त्र आणि तंत्रज्ञान :30
वाणिज्य आणि अर्थशास्त्र :30
शेती : 30
मुख्य परीक्षा गुणांकाची विभागणी
मराठी :200
सामान्य अध्ययन 1 :200
सामान्य अध्ययन 2 :200
वैकल्पिक विषय 8 पेपर :1600
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC )
महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील वर्ग 1 आणि2 अधिकारी निवडण्यासाठी राज्य पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे( MPSC )राज्यसेवा परीक्षा घेतल्या जातात.
कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.पदवीच्या टक्केवारीची अट नसते.
पदवी परीक्षेतील रिपीट विद्यार्थीही परीक्षा देऊ शकतो.
ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी किमान 19 आणि कमाल 33 वर्षे वय असावे लागते.
आरक्षित वर्गातल्या विद्यार्थांकरता कमाल वयोमर्यादा 33 +5=38 अशी आहे.
अपंगांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे.
विद्यार्थांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पोलीस खात्यातील भरतीसाठी आवश्यक ती शारीरिक पात्रताही विद्यार्थंाकडे असावी लागते.
मुख्य टपाल कार्यालयांमध्ये अर्जासह माहितीपुस्तिका 100 रुपयांना मिळते.
खुल्या वर्गासाठी परीक्षा फी -250 रु
मागासवर्गासाठी परीक्षा फी-125 रु
राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, विक्री कर अधिकारी , शिक्षणाधिकारी,मंत्रालय कक्षाधिकारी, गटविकास अधिकारी सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात.
पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा एक पेपर असतो त्याला सामान्य क्षमता चाचणी म्हणतात. त्यात विद्यार्थांने दोन तासांत 200 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात.
प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध असतात.
ही परीक्षा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात घेतली जाते.
पेपरच्या अभ्यासक्रम 12 आणि पदवीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.
ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
1-पूर्वपरीक्षा
यात ऑप्शनल प्रश्न असतात.
2-मुख्य परीक्षा
वर्णनात्मक प्रश्न असतात.
3- मुलाखत
उमेदवारचे व्यक्तिमत्व,सामाजिक राजकीय प्रश्नांचा अभ्यास,आपल्या भोवताली घडणार्या घडामोडींबाबतची जागरुकता,त्यांची निर्णय क्षमता,प्रसंगावधान याची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात.
इंटरव्ह्यूला जाताना नेहमी आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. तर ही भूमिका कशी स्पष्ट करायची ? वाचनानं ती करता येईल का ?
आनंद पाटील : इंटरव्ह्यूला जाताना चांगलं वाचन असेल तर त्याचा उपयोग होतो. शिवाय आपण आपला बायोडाटा नीट वाचून गेलं पाहिजे. बायोडाटातलं क्वालिफिकेशन्स, छंद पाहून बहुतेकदा प्रश्न विचारले जातात. त्यासाठी उमेदवारानं स्वत:ला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
एम.पी.एस.सी.च्या परीक्षेचं स्वरूप सांगा. त्या परीक्षेच्या काही अटी असतात का ?
आनंद पाटील : एम.पी.एस.सी.ची परीक्षा ही तीन टप्प्यांत होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आताच्या नवीन बदलांनुसार 1800 गुणांची ही परीक्षा असते. मगाशी सांगितल्याप्रमाणं जर लेखी परीक्षेत साडे आठशे गुण पडले तर मुलाखतीसाठी कॉल येतो आणि मुलाखतीत 100 गुण पडले तर एम.पी.एस.सी.ची क्लास वनची पोझिशन मिळू शकते. रिझर्व्हशन आणि इतर कोणत्या सवलतींनीही क्लास वनची परीक्षा असली पाहिजे. क्लाासवनमध्ये पहायला गेलं तर डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसिलदार आहे, अशा पदांवर काम करता येतं.
डेप्युटी कलेक्टर या पोस्टविषयी ब-याच कमी जणांना माहिती आहे. तर जरा सांगाला का ?
आनंद पाटील : डेप्युटी कलेक्टर म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड झाली तर त्याला शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवलं जातं. डेप्युटी कलेक्टर हे कॅडर शासनाच्या महसूल खात्याचं आहे. महसूल खात्यात काम करताना निवासी जिल्हाधिकारी हे सर्वोच्चपद आहे. हजारो माणसं त्याच्या हाताखाली काम करतात. म्हणून एमपीएसीची तयारी अधिक चांगली करायला हवी.
ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.विषयी काही माहिती सांगाल काय ?
आनंद पाटील : ऍग्रीकल्चरल एम.पी.एस.सी.साठी वर्ग 1 आणि वर्ग 2 ची म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रीक्लचरल ऑफिसरची भरती केली जाते. त्यात सामान्यज्ञान (200 गुण), ऍग्रीकल्चर (150) आणि ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग (100) या तीन विषयांचे पेपर असतात. त्यात कळेल अशा मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न विचारले जातात. या 450 गुणांची परीक्षेत 300 पेक्षा जास्त गुण पडले तर उमेदवारला मुलाखतीला बोलावलं जातं. मुलाखत ही 50 ते 75 गुणांची असते. त्यातून वर्ग - 1 आणि वर्ग - 2 चे अधिकारी निवडले जातात. याविद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर याविषयाचा पूर्ण अभ्याासक्रम असतो. 300 ते 400 अधिकारी निवडले जातात.
कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी एम.पी.एस.सीत काही विशेष केडर आहे का ?
आनंद पाटील : कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी कोणतीही खास एमपीएससीची परीक्षा नाही. तर रेग्युलर एम.पी.एस.सीची कोणतीही परीक्षा देता येते. म्हणजे पी.एस.टी.आय - एस.टी.आय.ची संचलित परीक्षा असते. त्याच्यानंतर राज्य शासनाची परीक्षा असते. तर कॉमर्स ग्रज्युएटस्ना या दोन्ही परीक्षा देता येतात.
हल्ली एम.पी.एस.सी.त निगेटिव्ह मार्किंग ही पद्धत आहे. त्यामुळे निगेटिव्ह उत्तरं देऊन चालत नाही. तर तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराला ?
आनंद पाटील : पूर्वी जे मेरीट वाढायचं ते आता निगेटिव्ह मार्किंगमुळे कमी होणार आहे. गेसिंगम्हणजे तर्काचा वापर करताना दक्षता घ्यावी लागणार आहे.अजिबात उत्तर येत नसेल तर त्याला हात लावायचा नाही. नाहीतर आपलाच गुण वजा होणार आहे.
अनेक मुलांची इच्छा असते की या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं. पण सर्वांनाच मिळत नाही. तर अशावेळी काय कराव ?
आनंद पाटील : काही मुलं अशी असतात की त्याना या परीक्षेत सतत अपयश येतं. अशावेळी मुलांनी थांबावं. नाहीतर नैराश्य येतं.