महिला शास्त्रज्ञ
1.पहिली रसायनशास्त्रज्ञ :
कोलेस्टेरॉल, पेनिसिलिन, जीवनसत्त्व B - 12, इन्शुलिन अशा आजच्या युगातल्या चिरपरिचित संज्ञा आणि त्याविषयीचे महत्त्वपूर्ण संशोधन सातत्याने 35 वर्षे करत राहणारी पहिली महिला रसायनशास्त्रज्ञ म्हणजे डोरोथी हॉजकिन. जीवनसत्त्व B - 12 च्या संशोधनासाठी तिला 1964 मध्ये रसायनशास्ज्ञाचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
2.पहिली महिला खगोलशास्त्रज्ञ:
कॅटलॉग मॅपिंग आणि आकाशातील सगळ्या ताऱ्यांचे स्पष्टीकरण देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ऍनी करत असे. ऍनीने दक्षिण गोलार्धातील जास्त प्रकाशमान (तेजस्वी) ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांची वर्गवारी करण्याचे कार्य केले. या अत्यंत गहन, किचकट कामासाठी तिची रोजची कमाई होती फक्त पाच सेंटस! अशी दोन लाख तीस हजार निरीक्षणे करण्याचे काम तिच्यासारखा एखादाच निरीक्षक करू शकतो.
3.सोफी जर्मेन : फ्रेंच गणितज्ज्ञ:
आवडत्या विषयातील संशोधन परभाषेत आहे म्हणून प्रथम त्या भाषा शिकणारी संशोधिका अठराव्या शतकात होऊन गेली, यावर विश्वास बसणे कठीण आहे. सामाजिक बंधनांमुळे या फ्रेंच मुलीला गणितासारख्या विषयातील आपले संशोधन पुरुषी टोपणनावाने जगासमोर आणावे लागले पण अखेर तिच्या जिद्दीला आणि हुशारीला समाजमान्यता मिळालीच. इसवी सन 1776 ते 1831 हा काळ म्हणजे मुलगी आणि तिचे शिक्षण याबद्दल विचारही न करण्याचा काळ.