What to read online/offline for MPSC UPSC काय वाचायला पाहिजे?


MPSC / UPSC काय वाचायला पाहिजे?

Here on the Internet you can find many publications and sites which will guide you properly 
Read carefully and get helped

1.For Agricultural knowledge : 
---Portal of govt of Maharashra
---Agrowon:daily newspaper for agriculture updates

2.चालू घडामोडी(Current affairs)
---Site for major newspapers in hindi and english
--इंडिया इयर बुक २०१०
--Magazine for various yojnas
--saptahiksakal :good magazine to read
--लोकराज्याच्या विविध आवृत्ती
--forum to discuss all matters
--current-affairs-quiz
---For few Marathi magazines


3.Also you can read other MPSC UPSC blogs which includs.....
--For G K
-- MPSC related FAQs
-- AnilMD's Blog
--Best ever blog you seen !!

‘चालू घडामोडी’ (करंट इव्हेंटस्) हा घटक अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे.
‘चालू घडामोडी’चे हे महत्त्व लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी आपल्या त 51;ारीच्या प्रारंभीच हे ठरविणे गरजेचे आहे की, पूर्वपरीक्षेतील ‘वैकल्पिक विषय’ आणि ‘सामान्य अध्ययन’ या दोन विषयांसोबतच चालू घडामोडी हा जणू तिसरा विषय ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ एवढाच की, चालू घडामोडी या घटकाला स्वतंत्रपणे पुरेसा वेळ देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या वेळेच्या एकूण नियोजनात वैकल्पिक विषयास ६०%, सामान्य अध्ययनास ३०% तर चालू घडामोडीस किमान १० ते १५% वेळ राखीव ठेवला पाहिजे.
चालू घडामोडीची तयारी सुरू करण्यापूर्वी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासपद्धतीचा एक भाग म्हणून गेल्या १० वर्षांतील मागील प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. यातून उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे हे लक्षात येते की, साधारणत: दरवर्षी या घटकावर ५० ते ६० प्रश्न विचारण्यात येत आहेत. या विश्लेषणातूनच चालू घडामोडींवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ, दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार व सन्मान, केलेल्या नियुक्त्या, विविध परिषदा, चर्चेतील व्यक्ती, महत्त्वाची पुस्तके, ग्रंथ व लेखक इ. विषयांवर प्रश्न विचारले जातात हे लक्षात येते. तसेच या विश्लेषणातून आणखी एक बाब लक्षात येते की, ती म्हणजे चालू घडामोडी या स्वतंत्रपणे तर विचारल्या जातातच, मात्र सामान्य अध्ययनातील सद्य घटना, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, भूगोल इ. विविध घटकांशी संबंधित चालू घडामोडीदेखील विचारल्या जातात. उदाहरणार्थ, २००९ मध्ये राज्यघटनेवर आधारित प्रश्नांमध्ये, ‘कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा ë0;ंत्रिमंडळाची संख्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्येच्या १५% एवढी मर्यादित करण्यात आली?’ असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडीची तयारी आवश्यक ठरते. विशेषत: अर्थव्यवस्थेच्या बाबतीत शासनाने जाहीर केलेल्या योजना, धोरणे, आर्थिक पाहणीतील आकडेवारी, अर्थसंकल्पातील काही बाबींवर प्रश्न विचारले जातात.
प्रश्नांचे विश्लेषण करून शेवटी आपल्या अभ्यासाची पद्धती निर्धारित करावी. मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचा पद्धतशीर विचार करून त्यांचे पुढीलप्रमाणे सूत्रबद्ध वर्गीकरण करावे. नियुक्त्या-निवड-बढती; पुरस्कार, सन्मान, पारितोषिके; ग्रंथ-लेखक, निधन; चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र; महत्त्वाच्या चर्चेतील कंपन्या, संस्था व त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र; महत्त्वाच्या परिषदा, संघटना; चर्चेतील ठिकाणे; विज्ञानातील शोध; महत्त्वाच्या समित्या- आयोग व त्यांचे अहवाल; नव्या योजना व धोरणे; महत्त्वाची आर्थिक आकडेवारी; महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या; महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ. अर्थात हे वर्गीकरण काहीसे लवचिक स्वरूपाचेच असावे. या वर्गीकरणानंतर प्रत्येक विभागात पुन्हा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी करावी. थोडक्यात, प्रश्नांचे रूप लक्षात घेऊन त्यावर आधारित ‘वर्गीकरण चार्ट’ बनवावेत आणि त्या त्या विभागात संबंधित घटना नमूद करावी.
चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी पद्धती व व्याप्ती निश्चित केल्यावर महत्त्वाचा प्रश्न उरतो तो संदर्भग्रंथाचा. या घटकाच्या तयारीसाठी ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ हे वर्तमानपत्र; फ्रंटलाईन या पाक्षिकातील कव्हरस्टोरीज; योजना, क्रोनिकल व विझार्ड ही मासिके; ‘इंडिय 66; इयर बुक’; चालू वर्षांतील आर्थिक पाहणी अहवाल हे संदर्भसाहित्य जरुरीचे ठरते. एवढय़ा मोठय़ा संदर्भसूचीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यापैकी हिंदू हे वर्तमानपत्र नियमित दीड ते दोन तास वाचावे, तर फ्रंटलाईनमधील कव्हरस्टोरीज (२० पाने) वाचल्या तरी पुरेसे ठरते. योजनेची सुमारे ४०-५० पाने वाचायची असतात. क्रोनिकल हे मासिक पायाभूत ठेवून त्यास विझार्डची जोड दिल्यास त्यातून फारच कमी भाग अभ्यासावा लागतो हे लक्षात येते. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात एक बाब लक्षात ठेवावी की, हिंदू हे वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे वाचल्यास इतर संदर्भ हे लवकर वाचून होतात. किंबहुना बऱ्याच घटनांची उजळणीच होते. त्यामुळे वेळेचे नियोजन करताना वर्तमानपत्र नियमितपणे वाचावे आणि इतर संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील एक दिवस दिला तरी पुरेसे ठरेल. म्हणजे सात ते आठ तासांचा एक दिवस असे एका महिन्यातील चार दिवस (म्हणजे ३२ तास) दिल्यास उर्वरित मासिके व्यवस्थिरीत्या वाचून होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या सोईनुसार यात लवचिकता ठेवल्यास काही हरकत नाही.
चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि त्यानुसार नोटस् काढाव्यात. म्हणजे एखादी महत्त्वाची परिषद झाली असल्यास तिचे ठिकाण, देश, त्या परिषदेतील मुद्दे व फलित; त्याच मुद्दय़ावरील मागील परिषदा, त्यांचे ठिकाण याचीही माहिती जमा करावी किंवा विविध स्पर्धाची तयारी करताना खेळाडू, क्रीडाप्रकार, स्पर्धाचा निकाल, त्यातील विक्रम; विजेता-उपविजेता याबरोबरच त्यांचे देशही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या चालू घडामोडीची तयारी करताना तिच्या आजूबाजूला शक्य त्या घटनांची तयारी करावी.
प्रस्तुत विषयाची तयारी करताना विविध माहितीची नोंद करण्यासाठी ‘डायरी’चा फॉर्मही वापरावयास हरकत नाही. कारण ‘डायरी फॉर्म’मधील माहिती केव्हाही, फावल्या वेळात वाचता येते. शिवाय चालू घडामोडीवरील प्रत्येक 60;ंदर्भाची सतत उजळणी म्हणजे रिव्हिजन करणे अत्यावश्यक आहे. तसेच या घटकांवर आधारित भरपूर प्रश्नांचा सरावही पूरक ठरतो. एकंदर प्रश्नांचे बारकाईने केलेले विश्लेषण, त्यावर आधारित चालू घडामोडींची तयारी, योग्य रिव्हिजन आणि प्रश्नांचा सराव या घटकासाठी मध्यवर्ती ठरतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन तयारी केल्यास ६० प्रश्नांपैकी किमान ५० प्रश्न अचूकपणे सोडवता येतील हे लक्षात घ्यावे. स्वाभाविकच अवघड वाटणाऱ्या सामान्य अध्ययनात अपेक्षित गुण मिळविण्यासाठी हा घटक सिंहाचा वाटा उचलणारा ठरतो आणि आपले आयएएसचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक पूर्वपरीक्षेचा अडथळा यशस्वीपणे पार करता येतो.
 


Reference Books for Maharashtra Lokseva Ayog


1. Study Circle Publications PSI Preliminary Examination Planner
By Dr. Anand Patil
Pages 1055
Price Rs. 450/-

2. Study Circle Publications Spardha Pariksha
Monthly magazine Rs. 30/-

3. Latest Chalu Ghada Modi
By Datta Sangolkar
Pages 160
Price Rs. 50/-

4. Pradnya's MPSC Rajya Seva Purva Pariksha Planner
By Sayas Karad
Pages 628
Price Rs. 400/-